भाग्य दिले तू मला मालिकेत साजरी होणार मंगळागौर…सानिया रचणार का नवा कट?
श्रावण महिना म्हंटलं महिलांसाठी खास असते ती म्हणजे मंगळागौर..कारण मंगळागौर हा महिलांचा जिव्हाळ्याचा विषय. नऊवारी साडी, नाकात नथ, साज शृंगार आणि मनात श्रद्धा.. असा भाव नेहमीच श्रावणात महिलांच्या मनात जागत असतो.
त्यामुळे कलर्स मराठी वाहिनीवरील आपल्या सगळ्यांच्या आवडत्या ‘भाग्य दिले तू मला’ मालिकेत रत्नमाला मोहिते मंगळागौर मोठ्या उत्साहात साजरी करताना दिसणार आहेत.मालिकेत मंगळागौरीची चांगलीच जय्यत तयारी करण्यात आली आहे.
सध्या मालिकेमध्ये सणांची लगबग दिसत आहे. सगळ्या कुटुंबांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. मालिकेच्या कथानकांमध्ये या सणांनुसार बदल केलेला पाहायला मिळत आहे. मराठी मालिकेमध्ये या सण समारंभाच्या काळात मालिकांमध्ये ट्विस्ट आलेला पाहायला मिळत आहे. रत्नमालाने कावेरीलासुद्धा सानियाच्या मंगळागौरीचे आमंत्रण दिले आहे. पण त्यासोबतच मालिकेत एक जबरदस्त ट्विस्ट समोर येणार आहे.
रत्नमाला मालिकेत सानियाची मंगळागौर साजरी करताना दिसणार आहे. रत्नमाला आणि कावेरी मंगळागौरीचे खेळ खेळताना दिसणार आहेत.
View this post on Instagram
रत्नमाला आणि कावेरी यांच्यामध्ये छान नातं तयार झालं आहे. दोघीही एकमेकींना नेहमी मदत करताना दिसून येतात. आता त्यामुळेच रत्नमाला कावेरीला मंगळागौरीचे आमंत्रण देणार आहे. मालिकेत दाखवत असल्याप्रमाणे पण सानियाला आधीपासूनच कावेरी आवडत नाही त्यामुळे तिला कावेरीला तिच्या मंगळागौरीला बोलावलेलं आवडत नाही. तिच्या मंगळागौरीत कावेरीच सगळ्यांचे लक्ष वेधून घेते. मालिकेत मंगळागौर साजरी करण्यात येणार आहेच, परंतू सानिया मात्र या आनंदाच्या क्षणात मिठाचा खडा टाकणार आहे. रत्नमाला मोहित आणि कावेरीला कसं दूर करता येईल याचा कट रचणार आहे.
कावेरी इतर महिलांसोबत मंगळागौरीचे खेळ खेळताना दिसणार आहे. मालिकेत मंगळागौर साजरी करण्यात येणार आहेच, परंतू सानिया मात्र या आनंदाच्या क्षणात मिठाचा खडा टाकणार आहे. रत्नमाला मोहित आणि कावेरीला कसं दूर करता येईल याचा कट रचणार आहे. मंगळागौरीची पूजा पार पडते आणि त्यानंतर खेळांना सुरुवात होते. पण, याच उत्साहाच्या वातावरणात आता ? सानिया आता कोणता नवा कट रचणार हे मालिकेच्या आगामी भागात कळेल.
यावेळी आपल्या सगळ्यांच्या लाडक्या कावेरीने पिवळ्या रंगाची नऊवारी साडी नेसली आहे, साजेसे असे दागदागिने देखील परिधान केले आहेत.
दरम्यान, मालिकेत नुकताच रक्षाबंधन साजरे करण्यात आले. तेव्हा कावेरीने राजला राखी बांधावी अशी मागणी सुवर्णाने केली होती. पण राजनेच त्याला साफ नकार देत सुवर्णाला चांगलाच सुनावलं होतं. त्यामुळे आता कावेरी आणि राजला एकमेकांवरील प्रेमाची जाणीव कधी होणार आणि हे दोघे एकमेकांकडे प्रेमाची कबुली कधी देणार हे बघण्याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.