‘भाभी जी घर पर है’ मालिकेतील या अभिनेत्यावर कोसळला दुःखाचा डोंगर..

भाबी जी घर पर है या लोकप्रिय शोवर एकावर एक दुःखांचे डोंगर कोसळतच आहेत. काही महिन्यांपूर्वीच या शोमधील अभिनेता दीपेश भानच्या आकस्मिक मृत्यूने सर्वानाच धक्का बसला होता. आणि आता, आणखी एका घटनेने सर्वांना दुःखी केले आहे. या शो मधील डॉक्टरची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता जीतू गुप्ता यांच्या मुलाने अवघ्या 19 वर्षी या जगाचा निरोप घेतला आहे. त्याला रुग्णालयात दाखल केल्यानंतर काही वेळातच मृत्यू झाला.

जीतू गुप्ता यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर आयुषचा फोटो शेअर करत त्याच्या मृत्यूची बातमी चाहत्यांना दिली. यानंतर कॉमेडियन सुनील पाल यांनीदेखील जीतू गुप्तांच्या मुलाच्या निधनावर दुःखद व्यक्त केले. सुनील पाल यांनी पोस्टसोबत कॅप्शनमध्ये लिहिले – ‘RIP, भाभी जी घर पर है मधील अभिनेता, माझा भावाचा मुलगा आयुष राहिला नाही.’

जीतू गुप्तांनी एक दिवसापूर्वीच आपल्या मुलाचा हॉस्पिटलमधील फोटो शेअर करून आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या होत्या. फोटोमध्ये आयुष हॉस्पिटलच्या बेडवर दिसत होता. आयुषचा हा फोटो शेअर करताना जीतूने सांगितले होते की, “त्यांच्या मुलाची प्रकृती गंभीर आहे आणि तो कोणाशीही बोलण्याच्या स्थितीत नाही. आयुषबद्दलची पोस्ट वाचून, तुम्हा सर्वांचे त्याच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी सतत फोन येत आहेत. तुम्ही सर्व जण देवाकडे प्राथना करा.”

काही जवळच्या सूत्रांनी आम्हाला माहिती दिली की आयुषला ताप आला होता आणि तो उतरला नाही तेव्हा त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्याचे नेमके काय झाले हे डॉक्टरांना समजण्यापूर्वीच त्याचे अवयव निकामी होऊ लागले आणि त्याची प्रकृती चिंताजनक होती. नंतर त्याला मृत घोषित करण्यात आले.

जीतू गुप्ता यांच्या मुलाचे कमी वयातच निधन झाल्याने ते अत्यंत दुःखी आहेत. त्यांनी अनेकदा आपल्या मुलासोबतचेचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पण असा फोटो शेयर करताना त्यांना झालेले दुःख स्पष्ट कळून येत आहे. लोक सोशल मीडियावर कमेंट करत आहेत आणि त्यांच्या मुलाच्या आत्म्याला शांती मिळो अशी प्रार्थना देखील करत आहेत.

जीतू गुप्ता ‘भाभी जी घर पर हैं’ या मालिकेत डॉक्टरची भूमिका साकारायचे. या शोमधून त्यांना विशेष ओळख आणि नाव मिळाले. ‘भाभी जी घर पर हैं’ ही मालिका त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट असल्याचे त्यांनी स्वतः एका मुलाखतींमध्ये सांगितले आहे.

Leave a Comment

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप