टीम इंडिया: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने आशिया चषक (आशिया कप 2023) मध्ये चमकदार कामगिरी केली आणि विक्रमी 8व्यांदा विजेतेपदावर कब्जा केला. आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा १० गडी राखून पराभव केला. तर अंतिम सामन्यानंतर टीम इंडिया ताबडतोब भारतात परतली आणि 22 सप्टेंबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 3 वनडे सामन्यांची तयारी सुरू केली.
त्याचबरोबर आशिया चषकानंतर लगेचच म्हणजेच सोमवारी रात्री उशिरा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर करण्यात आला आहे. सोमवारी टीम इंडियाचे मुख्य निवडकर्ते अजित आगरकर आणि रोहित शर्मा यांनी पत्रकार परिषदेत संघाची घोषणा केली.
विश्वचषकापूर्वी तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे २०२३ चा एकदिवसीय विश्वचषक यावर्षी भारतात खेळवला जाणार आहे. ज्याची सुरुवात 5 ऑक्टोबरपासून होणार असून अंतिम सामना 19 नोव्हेंबरला होणार आहे.
वर्ल्डकपपूर्वी टीम इंडियाला आपली तयारी आणखी मजबूत करण्यासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळायची आहे. एकदिवसीय सामन्यांची मालिका 22 सप्टेंबरपासून सुरू होणार असून मालिकेतील शेवटचा सामना 27 सप्टेंबर रोजी खेळवला जाणार आहे. यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ ८ ऑक्टोबर रोजी विश्वचषकातील पहिला सामना एकत्र खेळतील.
अश्विनचे पुनरागमन फिरकीपटू अष्टपैलू रविचंद्रन अश्विनचे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टीम इंडियाच्या संघात पुनरागमन झाले आहे. अश्विनला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीनही एकदिवसीय सामन्यांसाठी टीम इंडियाच्या संघात संधी मिळाली आहे. अश्विनने भारतासाठी तिन्ही फॉरमॅट खेळले आहे आणि आतापर्यंत त्याने टीम इंडियासाठी एकूण 272 सामने खेळले आहेत ज्यात त्याने 4076 धावा आणि 712 विकेट घेतल्या आहेत.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या 2 एकदिवसीय सामन्यांसाठी टीम इंडियाचा संघ केएल राहुल (कर्णधार), शुभमन गिल, रुतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, इशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, तिलक वर्मा, प्रसिद्ध कृष्णा, रविचंद्रन अश्विन, वॉशिंग्टन सुंदर.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल. वॉशिंग्टन सुंदर., कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.