अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरी या वर्षी बाप्पाच आगमन नाही होणार.. भावूक पोस्ट शेयर करत सांगितले कारण.
मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अदाकारीने वादळ आणणारी अप्सरा अर्थात सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नेहमीच चर्चेत असते.
आपल्या अजोड अभिनयानं तिने आजवर अनेक प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. सोनाली चित्रपट आणि छोट्या पडद्यावरुन प्रेक्षकांच्या भेटीस येते. काल अनेकांच्या घरी लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन धूमधडाक्यात झालं आहे. सर्वत्र उल्हासित वातावरण आहे. पण सोनालीनं मात्र यावरही त्यांच्या घरी गणेशोत्सव साजरा न करण्यामागील कारण एक स्पष्ट करत भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
सोनालीनं तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर कुटुंबासोबतचा फोटो शेअर करुन एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सोनालीनं तिच्या चाहत्यांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच सोनालीनं यावरही तिच्या घरी गणपती बप्पाचं आगमन होणार नाही, अशी माहिती दिली. सोनालीनं पोस्टमध्ये लिहिलं आहे की, “तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. इतक्या वर्षांत आम्ही यंदा पहिल्यादंच गणपती बसवत नाहीयोत. आजी म्हणाली होती, मी गणपती येईस्तोवर थांबते, पण निदान त्या शारीरिक वेदनांतून तिची सुटका झाली. ती जिथे कुठे असेल शांत, समाधानी, आनंदी असेल असं वाटतेंय. माझी लाडकी आजी आता माझ्या लाडक्या बाप्पा कडेच गेलीये. प्रिय आजी (आई), पुढच्या वर्षी, तू शिकवलंयस तसा, नेहमीप्रमाणे, तुझ्या मनासारखा गणेशोत्सव साजरा करू.’
सोनालीच्या आजीचं काही दिवसांपूर्वी निधन झालं. सोनालीनं एक पोस्ट शेअर करुन ही माहिती चाहत्यांना दिली. आजीसोबतचे काही फोटो सोनालीनं शेअर केले.त्याला तिनं कॅप्शन दिलं, ‘आजी …..तू आमच्यात असशील…. आम्ही असे पर्यंत. तिच्या या पोस्ट वर अनेकांनी कमेंट करत तिचे सांत्वन केले. दुःखाच्या प्रसंगामुळे ती यावर्षी गणेश उत्सव साजरा करू शकली नाही याचेही दुःख तिच्या या पोस्ट मधून प्रकर्षाने जाणवत आहे.
View this post on Instagram
सोनाली कुलकर्णी हिने या फेसबुक पोस्टमध्ये आजीसोबतच्या फोटोज् सहित तिने मागील वर्षी आणलेल्या लाडक्या बाप्पाचेही फोटो शेअर केले आहेत. गणेशभक्तांना तिने शुभेच्छाही दिल्या आहेत.तिने पुढच्या वर्षी तितक्याच श्रद्धेने गणेशोत्सव साजरा करणार असल्याचंही म्हटलं आहे.
सोनाली कुलकर्णीने मराठी चित्रपटांसह हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. कारण सोनाली कुलकर्णीने मराठी चित्रपटांमध्ये चांगले काम केल्याने बॉलीवूडमध्ये एन्ट्री मिळाली. दरम्यान, पांडू सिनेमासाठी तिला उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देखील मिळाला आहे. याचे फोटोज् देखील तिने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले होते.