बाहुबली फेम प्रभासची संपत्ती पाहून थक्क व्हाल…कोट्यवधी रुपयांचा बंगला..पर्सनल जिम

0

मित्रहो आपल्या अतरंगी अभिनयातून मेहनत रसिकांना वेड लावणारा बाहुबली म्हणजेच अभिनेता प्रभास काही ना काही कारणाने चर्चेत येत असतो. त्याचे अनेक चित्रपट प्रदर्शित झाले असून या सर्व चित्रपटातून त्याने प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. दाक्षिणात्य चित्रपटात अभिनेता म्हणून कार्यरत असणारा प्रभास बॉलिवूड वर देखील आपली छाप टाकत आहे. त्याला अनेकजण खूप पसंत करतात, त्यामुळे त्याचे चित्रपट पाहण्यासाठी नेहमीच गर्दी होते. नुकताच त्याचा “राधेश्याम” सिनेमा पडद्यावर आला असून, बघता बघता प्रेक्षकांच्या मनात सुद्धा भरत आहे.

View this post on Instagram

A post shared by Prabhas (@actorprabhas)

“राधेश्याम” चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर काही फारशी जादू केली नाही, मात्र यातून पुन्हा एकदा प्रभास खूप चर्चेत आला आहे. तो नेहमी आपली प्रोफेशनल लाईफ सर्वांशी शेअर करत असतो, मात्र पर्सनल लाईफ बद्दल फार काही बोलण्यास कधीच उत्सुकता दाखवत नाही. पण तरीही त्याच्या पर्सनल लाईफच्या बाबतीत चर्चा ही होतेच. सार्वजनिक ठिकाणी तो फारसा कमी दिसून येतो,मात्र प्रॉपर्टी मध्ये त्याला गुंतवणूक करायला नेहमीच आवडते. नुकताच एक बातमी समोर आली असून यामध्ये प्रभासने खरेदी केलेल्या दोन आलिशान घरांची चर्चा सुरू आहे.

त्याने हैदराबाद येथील उच्चभ्रू या ठिकाणी दोन आलिशान घर खरेदी केले आहेत, यातील एक बांगला जुबली हिल परिसरात आहे. आश्चर्य म्हणजे हा सुपरस्टार प्रभास जवळपास ६० कोटींच्या घरात राहतो. या बंगल्याची ठेवण खूपच सुरेख असून,सर्व सुखसोयींयुक्त हा बंगला आहे. विशेष म्हणजे त्याच्या घरातच त्याने जिम तयार केली आहे, हे या घराचे खास आकर्षण ठरते. आपण त्याला चित्रपटात पाहत आहोत, त्याची बॉडी अगदी दमदार आणि निरोगी दिसून येते. यावरून लक्षात येते की तो आपल्या फिटनेसकडे जास्त लक्ष देत आहे.

सोशल मीडियावर देखील त्याच्या घराचे व परिसराचे अनेक फोटो व्हायरल झाले आहेत. कधी कधी तो आसपास परिसरातील गार्डन मध्ये देखील वेळ घालवताना दिसून येतो. शिवाय तो तेथील झाडांची काळजी देखील खूप घेतो. त्याच्याकडे अनेक प्रकारच्या गाड्या आहेत, सुंदर बंगले आहेत. रिपोर्ट नुसार प्रभासकडे जवळपास २५० कोटींची संपत्ती आहे. यामध्ये त्याचे कार कलेक्शन सुद्धा उत्तम आहे. त्याच्याकडे रेंज रोव्हर स्पोर्ट्स, ऑडी ऑडी A6, बीएम डब्ल्यू 7 सिरीज,रोल्स रॉयल फॅन्टम यांसारख्या महागड्या कार आहेत.

View this post on Instagram

A post shared by Prabhas (@actorprabhas)

प्रभास एक उत्तम अभिनेता असून त्याचे सर्व चित्रपट नेहमीच बॉक्स ऑफिसवर जादू करतात, त्याच्या चित्रपटाचे खूप कौतुक होत असते. खास करून त्याने “बाहुबली” चित्रपटातून प्रचंड ओळख मिळवली आहे. पण नुकताच प्रदर्शित झालेला “राधेश्याम” व “साहो” काही खास गाजला नाही. पहिल्या दिवशी “राधेश्याम” चित्रपटाने १५ कोटींची कमाई केली आहे. हिंदी व्हर्जनच्या माध्यमातून या चित्रपटाने ४.५० कोटींची कमाई केली आहे. पण तरीही प्रभासच्या भावी आयुष्यासाठी व पुढील येणाऱ्या अनेक चित्रपटांसाठी भरपूर शुभेच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.

Leave A Reply

Your email address will not be published.