सुनील शेट्टीच्या घरी होणार आता लगीनघाई! या दिवशी होणार अथिया शेट्टीचा विवाह..

वास्तविक पाहायला गेले तर बॉलीवूड आणि क्रिकेट यांचं नातं पूर्वीपासून चालत आलं आहे! अनेक वर्षांपासून बॉलिवूड अभिनेत्री आणि क्रिकेटमधील खेळाडू यांच्या प्रेमकथा मीडियासमोर आल्या आहेत. यामध्ये भारतातील अनेक दिग्गज खेळाडूंची नावे देखील समाविष्ट आहेत! यातील काही प्रेमवीरांची प्रेमकथा अर्ध्यावर राहिली, तर काहींची पूर्ण होताना दिसली. यामध्ये विराट कोहलीअनुष्का शर्मा, हरभजन सिंगगीता बसरा, युवराज सिंग~ हेजल किच अशी अनेक नावे आहेत आणि आता लवकरच यात अजून एका जोडीचे नाव ऍड करण्यात येणार आहे!

 

या दोघांची प्रेम कथा अनेक दिवसांपासून रंगलेली दिसलेली आहे. ही जोडी म्हणजे भारतीय संघाचा सलामीवीर के एल राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टी!! अभिनेता सुनील शेट्टीची अथिया शेट्टी ही मोठी मुलगी आहे. के एल राहुल आणि अथिया गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. कित्येक वेळा वेगवेगळ्या ठिकाणी या दोघांना एकत्रितपणे स्पॉट देखील करण्यात आले आहे. म्हणूनच सध्या या दोघांच्या लग्नाच्या बातम्यांनी सोशल मीडियावर जोर धरला आहे.

क्रिकेटच्या मॅच चालू असताना आथिया देखील अनेक वेळा के एल राहुलला सपोर्ट करण्यासाठी मैदानावर आलेली दिसली. तसेच एका शस्त्रक्रियेसाठी राहुल जर्मनीला गेला असताना त्याच्यासोबत अथिया देखील जर्मनीला गेली होती. खरंतर आता हे दोघेही लग्नाचा विचार करत असलेले दिसत आहेत. यासाठी या दोघांच्या परिवारांनी देखील परमिशन देऊन टाकली आहे. येत्या २०२३ च्या सुरुवातीच्या महिन्यात ही बहुचर्चित जोडी लग्न बंधनात अडकणार आहे!

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राहुल आणि अथियाच्या लग्नाला २०२३ मध्ये ग्रीन सिग्नल मिळाला असून यासाठी जानेवारी किंवा फेब्रुवारी महिना ठरवण्यात आलेला आहे. मात्र अजूनही याची तारीख आणि ठिकाण ठरलेले नाही. विवाहा नंतर राहुल आणि अथिया मुंबईच्या देखण्या पाली हिल मधील संधू पॅलेस नावाच्या ठिकाणी राहतील, ज्याचे बांधकाम अजून देखील पूर्ण झालेले नाहीये!

मात्र या सर्व चर्चेबाबत अजूनही सुनील शेट्टी किंवा के एल राहुल यांच्याकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. सध्या राहुल शस्त्रक्रिया झाल्याने संघातून बाहेर आहे. दक्षिण आफ्रिके विरुद्ध झालेल्या मॅचच्या अगोदरच तो संघातून बाहेर पडला होता.

Leave a Comment

Close Visit uttamsheti