मालिका संपताच समृद्धी केळकरने उरकलं लग्न? मेहंदीचे फोटो पाहून चाहत्यांना शंका..
सध्या सर्वत्र लगीन सराई पहायला मिळत आहे. छोटया पडद्यावरील लोकप्रिय जोडी हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांचा लग्नसोहळा दिमाखात पार पडला. त्यांच्या या लगीनघाईमध्ये अन्य काही प्रसिद्ध कलाकारांच्या लग्नाच्याची बातम्या समोर आल्या आहेत.. सध्या स्टार प्रवाहवरील सगळ्यात जुनी मालिका ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेतील नायिका समृद्धी च्या लग्नाच्या बातमीने सर्वत्र खळबळ माजवली आहे.
दरम्यान, या मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. गेली दोन वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यानंतर या मालिकेने ४ डिसेंबर २०२२ रोजी प्रेक्षकांचा निरोप घेतला. गेल्या शनिवारी या मालिकेचा शेवटचा एपिसोड प्रदर्शित झाला.. आता ही मालिका संपल्यानंतर समृद्धीने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत, ज्यानंतर तिच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले आहे.मात्र मालिका संपताच कीर्ती म्हणजेच अभिनेत्री समृद्धी केळकरच्या घरी लगीनघाई सुरु झाली आहे. तिच्या हातावर मेहंदी सजलेली पाहून कीर्तीने लग्न झालं का? असा प्रश्न उभा ठाकला आहे.
View this post on Instagram
समृद्धीने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत, ज्यात तिच्या हातावर मेहेंदी सजली आहे. अभिनेत्रीकडे लगीनघाई तर आहे, समृद्धी केळकरने तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात समृद्धीच्या हातावर मेहंदी सजली आहे.पण ही तिच्या लग्नाची मेहंदी नसून तिच्या मोठ्या बहिणीच्या लग्नाची मेहंदी आहे.समृद्धीने हे फोटो शेअर करताना त्याच्या कॅप्शनमध्ये ‘ताईचं लग्न’ असं कॅप्शन दिलं आहे.
View this post on Instagram
फोटोंमध्ये समृद्धी तिच्या बहिणीबरोबर पोझ देताना दिसत आहे.तिचे हे फोटो पाहून आधी मात्र चाहत्यांनी तिच्याच लग्नाचा अंदाज बांधला होता.अभिनेत्रीने हे फोटो शेअर करताच चाहत्यांनी विविध कमेंट्स केल्या आहेत. ‘तुमचं लग्न कधी?’ असा सवाल चाहते अभिनेत्रीला करत आहेत. एका युजरने लिहिलं आहे की, ‘फोटो पाहिल्यावर आधी वाटलं की तुझचं लग्न आहे, वाटलं की मालिका संपल्यावर लगेच घरच्यांनी लग्न लावून दिलं की काय?’ तर चाहत्यांनी तिचा लूक पाहून ती खूप सुंदर दिसत असल्याच्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. तशा कमेंट देखील या पोस्टवर केल्या आहेत.
समृद्धी केळकरने आजवर आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं होतं. डॅशिंग आयपीएस ऑफिसर ते शांत, संयमी सून अशी कीर्तीची दोन्ही रूपं प्रेक्षकांना भावली होती.समृद्धी कीर्तीचा निरोप घेताना भावुक झाली होती.