हैदराबाद: पाकिस्तान क्रिकेट संघ विश्वचषक 2023 मध्ये सहभागी होण्यासाठी काल संध्याकाळी भारताच्या हैदराबाद येथे पोहोचला. हैदराबाद विमानतळावर भारतीय चाहत्यांनी पाकिस्तानी क्रिकेटपटूंचे जोरदार स्वागत केले.
पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम आणि संघाचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीसह अनेक पाकिस्तानी खेळाडूंनी सोशल मीडियावर पोस्ट करून भारतीय चाहत्यांचे आभार मानले आहेत. पाकिस्तान क्रिकेट संघाचे भारतात जोरदार स्वागत केले जात असून त्यांचे क्रिकेटर या पाहुणचाराचा आनंद लुटताना दिसत आहेत.
हैदराबादमध्ये ‘कबाब, बिर्याणी-टिक्का’चा आस्वाद घेताना पाकिस्तानी क्रिकेट संघ पाकिस्तान क्रिकेट संघाचे खेळाडू हैदराबादमधील 5 स्टार हॉटेल पार्क हयात हॉटेलमध्ये थांबले आहेत. पाकिस्तानी खेळाडू भारतात पाहुणचाराचा आनंद लुटताना दिसत आहेत.
पाकिस्तानी खेळाडूंनी भारतात येताच त्यांच्या हॉटेलमध्ये हैदराबादी बिर्याणी आणि कबाबचा आस्वाद घेतला. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तान क्रिकेट संघाच्या खेळाडूंनी रात्रीच्या जेवणासाठी हैदराबादी बिर्याणी, कबाब आणि इतर हैदराबादी खाद्यपदार्थ मागवले होते.
विश्वचषकातील पहिला सामना खेळण्यापूर्वी पाकिस्तान क्रिकेट संघ सराव सामना खेळणार आहे. संघ हैदराबादमध्ये २९ सप्टेंबर रोजी न्यूझीलंडविरुद्ध पहिला सराव सामना खेळणार आहे. या सामन्यानंतर संघ 03 ऑक्टोबर रोजी हैदराबादमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसरा सराव सामना खेळणार आहे.
पाकिस्तान विश्वचषकातील पहिला सामना नेदरलँड्सविरुद्ध खेळणार आहे पाकिस्तान क्रिकेट संघ 6 ऑक्टोबर रोजी नेदरलँड्सविरुद्ध 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. पाकिस्तान क्रिकेट संघ आपला पहिला सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळणार आहे.
पाकिस्तानचा संघ 7 वर्षांनंतर भारतात येऊन पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. याआधी 2016 मधील टी-20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान शेवटचा सामना खेळला होता.
विश्वचषक 2023 साठी पाकिस्तान क्रिकेट संघाची निवड बाबर आझम (कर्णधार), अब्दुल्ला शफीक, फखर जमान, इमाम-उल-हक, इफ्तिखार अहमद, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), शादाब खान, मोहम्मद नवाज, उसामा मीर, हरिस रौफ, मोहम्मद वसीम जूनियर, हसन अली, शाहीन शाह आफ्रिदी , सौद शकील, सलमान अली आगा