अरुंधती परतणार मालिकेत.. आल्या आल्या मोठ्या संकटाला सामोरे जावे लागणार..
स्टार प्रवाह वाहिनीवरील सर्वांचे मनाचा ठाव घेणारी मालिका म्हणजे आई कुठे काय करते. मालिकेत सध्या अनेक ट्विस्ट येत आहेत. ज्यामुळे मालिका खूपच रंजक बनत चालली आहे. दरम्यान, अरुंधती आणि आशुतोष यांच्या लव्ह स्टोरी मुळे मोठा ट्विस्ट आला. तर अरुंधती निर्धास्त पणे सर्व गोष्टींना तोंड देते आहे. दरम्यान ती आशुतोषसोबत लग्न करणार का,हा प्रश्नदेखील उत्तर अद्याप अनुत्तरित आहे. तर दरम्यानच्या काळात अरुंधती गायनाच्या कार्यक्रमाच्या दौऱ्यावर गेल्याचं मालिकेत दाखवण्यात आले होते. पण मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने मालिकेतून ब्रेक घेतला होता. पण ती आता लवकरच मालिकेत परतणार असल्याची खुशखबर समोर आली आहे.
View this post on Instagram
खूप दिवसांपासून अरुंधती मालिकेत दिसून आली नाही. इतकंच काय तर ऐन दिवाळीत ही ती मालिकेत दिसली नाही. पण आता मालिकेच्या पुढील भागात अरुंधती परत येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे अरूंधती च्या परत येण्यामुळे मलिकेत आणखी कोणता ट्विस्ट येईल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
खरंतर मधुराणी प्रभुलकरची एक छोटी सर्जरी झाल्याने तिनं मालिकेतून ब्रेक घेतला होता. आणि त्यांनतर ती तिच्या पुण्यातील घरी विश्रांती घेत होती. याबाबत तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर अपडेट्स देत प्रेक्षकांना माहिती दिली होती.
दरम्यान, मालिकेचा एक प्रोमो नुकताच व्हायरल झाला आहे. ज्यात अरुंधती आणि आप्पा यांची एंट्री दाखवण्यात आली आहे. आप्पा हरवतात तेव्हा घरचे सगळे त्यांना शोधत असताता. आप्पांच्या चिंतेत असतात. अशातच अरुंधती परत येते आणि आप्पांना शोधायला सुरूवात करते. येणाऱ्या भागांमध्ये आप्पा घरी परतणार आहेत. मालिकेतून गायब झालेले आप्पा आणि अरुंधती पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. मधुराणीची छोटीशी शस्त्रक्रिया झाल्याने तिने आरामासाठी निर्मात्यांकडून सुट्ट्या मागून घेतल्या होत्या. मात्र आता ती मालिकेत पुन्हा दिसणार आहे. त्यामुळे नेटकरीही खुश झाले आहेत.
मालिकेत आप्पा घरी आले असले तरी त्यांचा विसरणं वाढलं आहे. मालिकेच्या प्रोमोमध्ये दाखवल्याप्रमाणे, आप्पा आता बऱ्यापैकी गोष्टी विसरत चालले आहेत. त्यामुळे ते आता घरच्या लोकांनाही विसरतील का ? असा प्रश्न सर्वांसमोर उभा ठाकला आहे. यावर अरुंधती नक्की काय पाऊल उचलेल यावर चाहत्यांचे लक्ष केंद्रित झाले आहे. आप्पा आणि अरुंधती हे मालिकेत परत असले तरी मालिकेत आता मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मालिकेची कथा काहिशी बदललेली पाहायला मिळणार आहे.