अपूर्वाने या खास कारणामुळे चक्क विमानाने पाठवले स्पॉटबॉयचे पार्थिव..हे होत कारण

कलर्स मराठी वाहिनीवरील बिग बॉस मराठी ४’ मध्ये गाजत असलेली लोकप्रिय अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर चे अनेक चाहते आहेत. सोबतच तिचे फॅन फोलिविंग देखील जबरदस्त आहे. शो मध्ये तिचं स्पष्ट बोलणंच प्रेक्षकांना भावते आहे. आपल्या दमदार अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर तिने आता टॉप ५ मध्ये जागा मिळवली आहे. त्यामुळे तीच या सिझनची विजेती ठरणार का हे पाहण्याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. आज २७ डिसेंबर रोजी अपूर्वाचा वाढदिवस होता. यावेळी तिचा एक किस्सा चाहत्यांमध्ये व्हायरल होतोय. तिने हा किस्सा बिग बॉसच्या घरातच यशश्री मसूरकर हिला सांगितला होता. अपूर्वाने एका स्पॉटबॉयचं पार्थिव शरीर विमानाने दिल्लीला पाठवलं होतं. नक्की काय घडलं जाणून घ्या..

अपूर्वा जेव्हा ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेचं चित्रीकरण करत होती. या मालिकेचं चित्रीकरण कोकणातील सावंतवाडी येथे होत होतं. तेव्हा अपूर्वाला चित्रीकरणासाठी सतत प्रवास करावा लागायचा. त्यामुळे ती मुंबई ते गोवा असा विमान प्रवास करायची आणि गोव्याहून सावंतवाडी असा अडीच तासांचा प्रवास गाडीने करायची. त्यांच्या मालिकेच्या सेटवर एक स्पॉटबॉय होते. त्यांना अपूर्वाचा विमानाने प्रवास करण्याची इच्छा होती.

पण परिस्थितीमुळे ही इच्छा त्यांच्यासाठी फार मोठी गोष्ट होती. अनेकदा त्यांनी असा प्रवास करण्याची इच्छा बोलून दाखवली होती. पण अकस्मात त्यांचं तरुण वयातच निधन झालं. त्यानंतर त्यांची विमानप्रवासाची इच्छा पूर्ण करण्यासाठी तिने त्यांचं पार्थिव शरीर विमानाने दिल्लीला पाठवलं. आपण निदान त्यांची शेवटची इच्छा पूर्ण केली याचं समाधान मिळालं असं अपूर्वाने म्हटलं होतं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Apurva Nemlekar (@apurvanemlekarofficial)

अपूर्वाची ‘रात्रीस खेळ चाले’ मधील शेवंताची भूमिका प्रचंड गाजली होती. तिने मालिकेचे दोन भाग केले. मात्र तिसऱ्या भागात आलेल्या नवख्या कलाकारांच्या टोमण्यांना कंटाळून आणि निर्मात्यांसोबत झालेल्या वेळेच्या आणि पैशांच्या वादामुळे तिने अचानक मालिका सोडली. तेव्हा प्रेक्षकही तिच्या बाजूने उभे राहिले होते. दुसऱ्या अभिनेत्रीला तितकी लोकप्रियता मिळाली नाही.

दरम्यान, वाढदिवस साजरा करण्याबाबत तिने एक खास पोस्ट शेयर केली होती. पोस्टमध्ये तिने लिहिलं की,”‘मंगळवारी माझा वाढदिवस आहे. माझ्या बर्थ डेला असं कुणी एक्ससाइटेड नाही झालंय कधी. मी माझ्या दर बर्थ डेला रडते. असं काही ग्रेट घडलंच नाही वाढदिवसाला. मी त्या दिवशी घरीच असते. दुपारी घरीच जेवतो आणि रात्री कुटुंबासोबत जेवायला जातो,’ असं ती म्हणते.

अपूर्वा सध्या सिंगल आहे. अर्थात तिचं आधी लग्न झालेलं आहे. ०१४ मध्ये तिने रोहन देशपांडेसोबत लग्नगाठ बांधली होती. मात्र त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही.

Leave a Comment

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप