चित्रपट सृष्टीला रामराम करत ही अभिनेत्री करत आहे आता शेती! लेख वाचून वाटेल तिचे कौतुक!!

सिनेइंडस्ट्रीच्या लाईमलाईट मध्ये आल्यावर एखादा अभिनेता अथवा अभिनेत्री या चंदेरी दुनियेपासून दूर राहणे शक्यतो अशक्यच अशी गोष्ट असते! पण या गोष्टीलाही अपवाद ठरवत ‘ही’ लोकप्रिय अभिनेत्री चंदेरी लाईमलाईट पासून दूर राहूनही सध्या शेती करताना दिसत आहे.

 

‘अगले जनम मोहे बिटिया ही कीजो’ या मालिकेमधून अभिनेत्री रतन राजपूत छोट्या पडद्यावर झळकली होती. परंतु तेव्हापासून लाईमलाईट मध्ये असलेली रतन सध्या मात्र सगळा तामझाम सोडून आपल्या गावी आपल्या आयुष्य साधेपणाने घालवताना दिसत आहे. यामुळे सध्या रतन नेमकी करत तरी काय आहे? असे अनेक प्रश्न तिच्या चाहत्यांच्या मनात निर्माण झाले आहेत!

सध्या टीव्ही इंडस्ट्रीत पासून दूर असलेली रतन आपल्या गावामध्ये ग्रामीण आयुष्य जगताना दिसत आहे किंवा आपण असं म्हणू शकतो की ती शेतकरी बनली आहे! वाचून आश्चर्य वाटलं ना? पण होय हे खरे आहे!! आजकाल रतन तिच्या गावी शेती करताना दिसत आहे. याबद्दलची माहिती ती तिच्या चाहत्यांना आपल्या यूट्यूब चैनल मधून वेळोवेळी देत असते.

रतन राजपूत खरंतर मूळची बिहारची आहे. त्यामुळे सध्या ती या ठिकाणी असणाऱ्या तिच्या आरा नावाच्या गावात स्थायिक झाली आहे. याबद्दलची माहिती देताना रतन सांगते की, तिच्या गावातल्या गावकऱ्यांनी तिला यासाठी खास आमंत्रित केलं आहे. गावात जाऊन पोहोचलेली रतन राजपूत तिच्या शेतात काम करणाऱ्या इतर महिलांना देखील मदत करते आणि शेतात ती भात लावणी करण्यासाठी देखील जाते.

रतनला अशा प्रकारे शेतात काम करताना पाहून नेटकऱ्यांनी आणि तिच्या फॅन्सनी तिचे खूप कौतुक केले आहे! कोरोना काळात लॉकडाऊन मध्ये रतन तिच्या गावी अडकली होती तेव्हापासून तिला शेतीची आवड निर्माण झाली असावी. रतन तिच्या सोशल मीडिया हँडलवरून चांगलीच ऍक्टिव्ह रहात असून तिच्या गावातील व्हिडिओ आणि फोटो पाहणे तिच्या फॅन्सना प्रचंड आवडत आहेत!

‘रिश्तो का मेला’ ‘महाभारत’ ‘राधा की बेटीया’ ‘कुछ कर दिखायेंगे’ ‘दिल से दिया वचन’ बिग बॉस ७, ‘संतोषी माँ’ ‘फियर फाइल्स’ अशा विविध टीव्ही मालिकांमधून रतन छोट्या पडद्यावर अनेकदा झळकली होती. याच दरम्यान २०१० मध्ये ‘रतन का रिश्ता’ या रियालिटी शोमुळे ती प्रसिद्धीच्या शिखरावर जाऊन पोहोचली होती! परंतु या शोमुळे तिला भरपूर पैसा आणि प्रसिद्धी जरी मिळाली असली तरी यामुळे ती अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकताना दिसली!

Leave a Comment

Close Visit uttamsheti