सोनम कपूर, देबिना आणि बिपाशा नंतर आता या प्रसिद्ध अभिनेत्रीने दिली गोड बातमी, पोटावर हात ठेवून दाखवले बेबी बंप…

‘पवित्र रिश्ता’ या लोकप्रिय शो मधून प्रसिद्ध होणारी टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे पुन्हा एकदा मीडियामध्ये चर्चेत आलेली दिसते! आपल्या सोशल मीडिया हँडल वरून अंकिता अतिशय ॲक्टिव्ह असते आणि आपले वेगवेगळ्या पोजमधील फोटो ती कायमच फॅन्स सोबत शेअर करत असते! विवाहा नंतर अंकिता तिचा पती विकी जैन सोबत देखील आपल्या हटके रोमांटिक अंदाजातील फोटो शेअर करताना दिसली आहे!

 

काही काळापूर्वीच अंकिताने दोघांचाही एक रोमँटिक फोटो आपल्या फॅन सोबत शेअर केला आहे आणि हा फोटो पाहिल्यावर त्यांचे चाहते आश्चर्यचकित झाले आहेत! आणि हा फोटो लावून असा अंदाज लावत आहेत की अंकिताकडे आता गोड बातमी आहे, कारण या फोटोमध्ये तिचा बेबी बंपही दिसत आहे! अंकिताने शेअर केलेला तिचा हा फोटो तुफान वायरल झालेला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ankita Lokhande Jain (@lokhandeankita)

यावेळी अंकिता लोखंडेने तिचा मित्र आणि पती असलेल्या विकी जैन सोबत एका पार्टीचे फोटो शेअर केलेले आहेत. यामध्ये तिने ब्लू कलरचा स्टायलिश गाऊन घातलेला पाहायला मिळत आहे. यात विकीने अंकिताच्या पोटावर हात ठेवून पोज दिली आहे. त्यामुळे चाहत्यांच्या अशा प्रतिक्रिया येत आहे की त्यांनी आपली गोड बातमी देण्यासाठी असा फोटो क्लिक केला आहे.

यादरम्यान फोटोच्या कॅप्शन मध्ये अंकिताने लिहिले आहे की, “तुम्ही जसे आहात जसे राहाल मी तुम्हाला त्याच रूपामध्ये प्रेम करत राहील”

अंकिताने शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. यात कोणी तिच्या या सुंदर लुकचे कौतुक करत आहे, तर कोणी तिला ती प्रेग्नेंट आहे का? असे विचारत आहे, तर खूप जणांनी तिला याबाबत शुभेच्छा ही दिल्या आहेत! संबंधित फोटोमध्ये विकीने अंकिताच्या पोटावर हात ठेवून पोज दिली असल्याने त्यांचे फॅन्स असा अंदाज लावत आहे की अंकिता प्रेग्नेंट आहे. असे असले तरी या दोघांकडूनही या न्यूजवर कोणतीच अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. परंतु अंकिताच्या चाहत्यांना आता तिच्या प्रेग्नेंसीबाबत उत्सुकता लागली आहे एवढं नक्की!

विकी जैन आणि अंकिता लोखंडे या जोडीचा विवाह सोहळा डिसेंबर २०२१ मध्ये संपन्न झाला होता. या दोघांचीही भेट त्यांच्या एका म्युचल फ्रेंड द्वारे झाली होती. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यावर या दोघांनी लग्न केलं. गेल्या काही दिवसांपूर्वीच ही जोडी त्यांच्या नवीन घरामध्ये शिफ्ट झाली आहे ज्याचे फोटो देखील सोशल मीडियावर बरेच व्हायरल झाले आहेत!

Leave a Comment

Close Visit uttamsheti