स्काय ब्लू कलरचा ड्रेस परिधान करून अंकिताने वेधले चाहत्यांचे लक्ष, चाहते म्हणाले…खूप हॉट
छोटया पडद्यावरील सर्वांची लाडकी अर्चना म्हणजेच अंकिता लोखंडे सध्या नेहमीच चर्चा येत असते. एक फॅशन स्टार म्हणून अंकिताची बरीच ख्याती आहे.
सोबतच ती सोशल मीडियावर ॲक्टीव्ह असणाऱ्या कळकरांपैकी एक आहे. दरम्यान, तिचा हॉट लुक चाहत्यांना घायाळ करतोय. तुम्ही पाहिलात का तिचा हा नवा लूक?
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या स्काय-ब्लू ऑफ-शोल्डर मिनी ड्रेसमध्ये अंकिता भलतीच सुंदर दिसते आहे. तिच्या या फोटोवर चाहत्यांनी लाइक्सचा पाऊस तर पाडलाच आहे शिवाय अशा वेधक कॉमेंट्स केल्या ज्या वाचून चाहत्यांचे तिच्यावरील प्रेम सहज दिसून येत आहे.
अंकिता लोखंडे ही हिंदी मनोरंजन उद्योगातील सर्वात सुंदर आणि सर्वात फिट अभिनेत्रीपैकी एक आहे आणि टीव्ही इंडस्ट्रीमध्ये एक चांगला कार्यकाळ केल्यानंतर चित्रपटांमध्ये यशस्वी करिअर घडवण्याची ही अभिनेत्री एक उत्कृष्ट उदाहरण आहे.
अंकिता लोखंडे हिचा झी सिनेस्टार की खोज या शोमध्ये सहभाग होता. या शोमध्ये तिने स्पर्धक म्हणून सहभाग घेतलेला. हा शो तर अंकिता जिंकू शकली नाही परंतु या शोच्या माध्यमातून तिने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आणि याच शोमुळे तिची लोकप्रियता वाढू लागली आणि तिला पवित्र रिश्ता ही मालिका करण्याची संधी चालून आली. भारतातील सर्वोत्कृष्ट सिनेस्टार की खोज मध्ये सहभाग घेतल्यानंतर अंकिता लोखंडेला एकता कपूरच्या सर्वात गाजलेल्या पवित्र रिश्तामध्ये अर्चनाची मुख्य भूमिका करण्याची सुवर्णसंधी तिला मिळाली.अंकिताला यामुळे ओळख आणि प्रसिद्धी मिळाली.
या मालिकेमध्ये अंकिता अर्चनाच्या भूमिकेमध्ये होती. अंकिताची ही भूमिका इतकी गाजली की प्रत्येक जण तिला अंकिता नव्हे तर अर्चना म्हणूनच ओळखू लागले. २०१८ मध्ये अंकिताने चित्रपट क्षेत्रात प्रवेश करण्यापर्यंत ती निवृत्त होईपर्यंत ती एक सर्वाधिक मानधन घेणारी टेलिव्हिजन कलाकारांपैकी एक होती. या शोमुळे अंकिताला भरपूर प्रसिद्धी लाभली. २००९ मध्ये सुरू झालेली ही मालिका पवित्र रिश्ता २०१४ मध्ये संपली.
अंकिता ही एक फॅशनिस्टा आहे जी वारंवार तिच्या हटके लूक्स नी चाहत्यांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरते. सोशल मीडियावरील तिचे हॉट फोटोज् नेहमीच चाहत्यांना आकर्षित करण्यात सक्षम ठरतात.
दरम्यान,अंकिताने मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी, बागी थ्री असे दोन चित्रपट देखील केले.रितेश देशमुख आणि दिग्दर्शक अहमद खानसोबत सिनेमात उत्कृष्ट कामगिरी निभावली. यासाठी तिचे खूप कौतुक देखील झाले.