आई कुठे काय करते मालिकेतील अनिरुद्ध ने लिहिली ऑनस्क्रीन नातीसाठी क्यूट पोस्ट.. फोटोज् पाहून तुम्हीही म्हणाल “क्यूट”

स्टार प्रवाह वाहिनीवरील‘आई कुठे काय करते’ सध्या चाहत्यांच्या मनावर अधिराज्य करणारी मालिका ठरली आने.. या मालिकेतील आई म्हणजेच अरुंधती बरोबरच तिच्या अवतीभवती असणाऱ्या प्रत्येक पात्राचे देखील चाहत्यांच्या मनात आपले असे स्थान आहे. दरम्यान,या मालिकेत अनिरुद्धची भूमिका साकारणारे अभिनेते मिलिंद गवळी हे सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असलेले पहायला मिळतात. आणि आता त्यांनी त्यांच्या ऑनस्क्रीन नातीसाठी केलेली एक क्यूट पोस्ट जबरदस्त व्हायरल होत आहे.

मालिकेत आता एका नव्या चिमुकल्या कलाकाराची एंट्री झाली आहे. आई कुठे काय करते या मालिकेत अभिषेक आणि अनघाला मुलगी झाली आहे. या त्यामुळे अनिरुद्ध आणि अरुंधती आजी-आजोबा झाले आहेत. या चिमुकल्या पाहुणीच्या येण्याने कुटुंबात सर्वानाच आनंद झाला आहे. तो फक्त ऑनस्क्रीन नाही तर ऑफस्क्रिन देखील. या चिमुकलीच्या स्वागताच्या निमित्ताने अनिरुद्धने अर्थात मिलिंद गवळी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Milind Gawali (@milindgawali)

पोस्ट शेयर करत ते म्हणाले,” गोड गोंडस परी राणी”त्विशा”“आई कुठे काय करते “ या मालिकेमध्ये देशमुख कुटुंबात आता आली आहे एक नवीन मेंबर . कसली गोंडस आहे “त्विशा “ .सहसा लहान मुलं दुसऱ्या कोणाकडे अशी पटकन जात नाही,पण हे बाळ अगदी हसत खेळत माझ्याकडे आलं,असं वाटलं नाही की पहिल्यांदाच हिला आपण पाहिलंय, भेटलोय, अगदी आपल्या कुटुंबांमध्ये एक नवीन मेंबर आला आहे असंच वाटत होतं,तिने क्षणात सगळ्यांनाच आपलंसं करून घेतलं.लहान बाळ असेल तर आपोआपच भारी चैतन्य पसरतं,जीवन किती सुंदर आहे असं वाटायला लागतं,चेहऱ्यावरील निरागस हास्य, आमच्या सेटवरचे वातावरणच बदलून गेलं आहे. प्रेक्षकांना सूधा खूप छान वाटणार आहे बाळाच्या आजूबाजूला घडणारे प्रसंग बघून.”

दरम्यान सध्या आई कुठे काय करते ही मालिका चांगलीच रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. या मालिकेत सध्या अभिषेक आणि अरुंधतीमध्ये वारंवार खटके उडताना दिसत आहेत. जो अभी अरूंधती साठी काहीही करायला तयार होता तोच आज तिच्या विरोधात गेला आहे. तर दुसरीकडे अभिषेकच्या अशा वागण्यामुळे अनघाही खचली आहे. दरम्यान, बाळाची दृष्ट काढत असताना अभीने अरुंधती चा अपमान केल्याचे पहायला मिळाले आहे. आता यावर अरुंधती काय पाऊल उचलते? आणि मालिकेत आता पुढे काय घडणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Leave a Comment

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप