दोन्ही किडन्या निकामी, आर्थिक चणचण, औषधांचाही खर्च भागेना; प्रसिद्ध अभिनेत्रीला काम मिळणंही झालं बंद, म्हणाली, “डायलिसिसमुळे मला…”

0

छोट्या पडद्यावरील सुप्रसिद्ध अभिनेत्री अनाया सोनी गेल्या दोन वर्षांपासून शारिरीक समस्यांमुळे त्रस्त आहे. सध्या ती डायलिसिसवर आहे. ‘मेरे साई’ या मालिकेमुळे अनाया प्रसिद्धीच्या झोतात आली. तिघी किडनी निकामी झाली असल्याचं अनायाने सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलं आहे. शिवाय वाढत्या शारिरीक समस्यांमुळे अनायाला आर्थिक संकटाचाही सामना करावा लागत आहे.

‘आजतक’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये अनायाने तिच्या खासगी आयुष्याबाबत खुलासा केला आहे. अनाया म्हणाली, “दोन दिवसांपूर्वीच मी ‘मेरे साई’ मालिकेच्या चित्रीकरणावरून घरी आले आहे. डायलिसिसमुळे मी नियमित काम करू शकत नाही. ज्या दिवशी डायलिसिस असतं त्या दिवशी सेटवर जाणं मला शक्य होत नाही.

महिन्यातील १२ दिवस माझे यामध्येच निघून जातात. किडनी जोपर्यंत मला मिळत नाही तोपर्यंत ही परिस्थिती अशीच राहणार आहे. प्रत्येक सेशनसाठी १५०० रुपये खर्च शिवाय औषधांचा खर्च वेगळा असतो. औषधांच्या खर्चासह माझं घर भाडं तसेच इतर खर्च आहेत. शारीरिक समस्यांमुळे माझी कमाईही कमी झाली आहे. आता मी रुग्णालयाजवळ घर भाड्याने घेतलं आहे.”

यापुढे अनाया सोनी म्हणाली, की ती ज्या दिवशी डायलिसिसवर असेल त्या दिवशीही ती शूटिंगसाठी तयार असते. पण टिव्ही इंडस्ट्री मधील लोक तिला साइन करायला घाबरतात कारण सेटवर त्याच्यासोबत काही घडू शकते. या कारणामुळे, ती सध्या फक्त छोट्या-मोठ्या भूमिका करून जगावं लागत आहे.

माझ्यावर उपचार होण्यासाठी पैसे जमा व्हावे म्हणून मी सोशल मीडियावर दोन्ही किडन्या निकाम्या झाल्या असल्याची पोस्ट शेअर केली. पण त्याचा मलाच गैरफायदा झाला. कामासाठी किंवा ऑडिशनसाठी मी जिथे जाते तिथे मला या आजारामुळे नकार मिळत आहे. कित्येकांनी माझ्या आजाराची खिल्लीही उडवली. तू तर अधिक पैसे कमावत आहेस, तुझ्याकडे पैसे जमा झाले असतील असं अनेकांनी मला म्हटलं. पण त्याकडे मी दुर्लक्ष केलं. आता फक्त काम मिळत नसल्यामुळे मी खचले आहे. सोनू सूद तसेच ‘मेरे साई’च्या सेटवरील अनेक लोकांनी मला आजपर्यंत मदत केली आहे.” २०१५मध्ये अनायाच्या दोन्ही किडन्या निकाम्या झाल्या. तेव्हा तिच्या वडिलांनी तिला किडनी दिली. पण करोनाकाळात ती किडनीही निकामी झाली.

अनया सोनीच्या दोनीही किडन्या साल २९१५ मध्ये निकामी झाल्या होत्या. त्यानंतर तिच्या वडिलांनी तिला त्यांची एक किडनी दिली होती. पण कोविडमध्ये ही किडनीही निकामी झाली आहे. आता अनया सोनी डायलिसिसवर असून तिला किडनी प्रत्यारोपण करावे लागणार आहे. अनायाने सांगितले की तिने किडनीसाठी अर्ज केला आहे. ती किडनी मिळण्याची आतुरतेने वाट पाहत आहे. अनया सोनी म्हणाली, ‘मला संपायचे नाही. आणि हिम्मत तर अजिबात हरणार नाही. ,

Leave A Reply

Your email address will not be published.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप