नवा गडी नवं राज्य मालिकेतील आनंदीचा आनंदी प्रवास माहिती आहे का?

0

मोठया पडद्यावर आपल्या अभिनयाची छाप सोडत आता छोट्या पडद्यावरील नवा गडी नवं राज्य या मालिकेत पदार्पण करणारी चाहत्यांची लाडकी आनंदी अर्थात पल्लवी पाटील सध्या खूप गाजत आहे. दरम्यान या मालिकेने अगदी कमी कालावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. या मालिकेतील आनंदीची भूमिका अभिनेत्री पल्लवीने उत्कृष्टरित्या साकारली आहे. चला तर जाणून घेऊया पल्लवी पाटील बद्दल..

 

View this post on Instagram

 

A post shared by Pallavi Patil (@officialpallavipatil)

अभिनेत्री पल्लवी पाटील हीचा जन्म 4 नोव्हेंबर रोजी जळगाव जिल्ह्यातील धुळे येथे झाला तिने आपले शालेय शिक्षण सर्वोदय माध्यमिक विद्यालयातून पूर्ण केले तर उच्च माध्यमिक शिक्षण प्रताप कॉलेजमधून पूर्ण केले. त्यानंतर डी वाय पाटील महाविद्यालयातून पल्लवीने आर्किटेकची पदवी प्राप्त केली २०१५ मध्ये क्लासमेट्स या चित्रपटातून तिने पहिल्यांदाच मराठी चित्रपटसृष्टीत पहिले पाऊल टाकले. या चित्रपटात पल्लवीने ‘हिना’ ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.

याच बरोबर तिने झी युवा वरील प्रेम हे आणि सोनी मराठीवरील जिगरबाज या मालिकांमध्येही पल्लवीने काम केले आहे. नवा गडी नवं राज्य या मालिकेद्वारे पल्लवी पाटील छोट्यापडद्यावर पदार्पण करत आहे. पल्लवी पाटील हिचं पात्र गावातून आपल्या आईं वडिलांकडून मिळालेल्या संस्कारांची शिदोरी घेऊन आलेली मुलगी रामाचा अर्धा राहिलेला संसार पूर्वपदावर आणण्याचा कसोशीने प्रयत्न करते. तिच्या बाळाची आई होताना जणू प्रसव वेदना सहन करते आणि सासू हीच आपली आई आहे या विचाराने सासूला आपलंसं करण्याचा चंग बांधते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pallavi Patil (@officialpallavipatil)

छोट्या पडद्यावरचा हा पहिला प्रवास पल्लवीसाठी खूप मोठी संधी घेऊन येत आहे आणि आनंदीच पात्र निभवायला ती खूप उत्साहित आहे. आपल्या या पात्राबद्दल बोलताना ती म्हणाली, “मराठी चित्रपटात खूप शिकायला मिळालं आणि आता मला एक नवीन संधी मिळाली आहे, या मालिकेत काम करण्याची. आनंदी हे पात्र रमाचा अर्धा राहिलेला संसार पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न करते आणि सगळी आव्हानं स्वीकारते. आनंदीचं पात्र निभावताना मला खूप आनंद होत आहे आणि प्रेक्षकांना पण आनंदीच पात्र आवडेल अशी अपेक्षा करते.”

दरम्यान, हिंदी मध्ये तिचे तेरी मेरी दास्तान हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीस आले होते. या गाण्यात सिद्धार्थचा शांत तर पल्लवीचा काहीशा चुलबुला अंदाज पहायला मिळाला. प्रत्येक प्रेमकथेत असणारा ‘प्रेम’ हा समान धागा सोडला तर प्रत्येकाच्याच प्रेमाची एक निराळीगोष्ट असते अशीच प्रेमात पाडणारी ‘लव्हेबल’ गोष्ट या अल्बम मधून सुंदर पद्धतीने उलगडते.

Leave A Reply

Your email address will not be published.