अभिनयासोबतच या क्षेत्रात सक्रीय आहेत हे साऊथ सुपरस्टार्स..साईड बिझनेसमधून हि कमावतात बक्कळ पैसे..

सध्या सर्वत्र साऊथ मूव्हीजचा बोलबाला आहे. गेल्या काही काळात दाक्षिणात्य चित्रपटांची रेलचेल जगभर पहायला मिळत आहे. साऊथ इंडस्ट्री मधील लोकप्रिय कलाकार चाहत्यांच्या मनावर अधिराज्य करण्यात आता अव्वल स्थानी पोहोचले आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का? अभिनया व्यतिरिक्त साऊथ स्टार्स इतर क्षेत्रातही फेमस आहेत. आणि मोठमोठ्या फर्मचे मालक देखील आहेत. कोण आहेत हे कलाकार आणि कोणत्या आहेत या फर्म जाणून घ्या.

अल्लू अर्जुन
पुष्पा’फेम सुपरस्टार अल्लू अर्जुन हा अनेक दशकांपासून सर्वांचा लाडका अभिनेता आहे. तो नेहमी सिनेमा, जाहिरातीतून कोट्यवधीची कमाई करतो. पण याशिवाय तो एक यशस्वी बिझनेसमॅनदेखील आहे.अल्लू अर्जुनने हैदराबादमधील बफेलो विंग्स फ्रँचायझीचे हक्क विकत घेतले आहेत. त्याची पत्नी स्नेहा रेड्डी हिचा पिक ए बू नावाचा फोटो स्टुडिओ आहे. अल्लू अर्जुनने नुकतंच सिनेमा थिएटरच्या व्यवसायातही पाऊल टाकलं आहे आणि आशियाई सिनेमाच्या सहकार्याने त्याने AAA सिनेमा शृखंला त्याने सुरू केली आहे.

नागार्जुन अक्किनेनी
साऊथचा सुपरस्टार चिरतरुण नागार्जुन अक्किनेनी याच्याकडे अन्नपूर्णा स्टुडिओ या प्रॉडक्शन हाऊसचा मोठा भाग आहे. ही केवळ एक प्रॉडक्शन कंपनी नाही तर हैदराबादच्या सर्वात महागड्या एरियात ७ एकरांवर पसरलेला एक आलिशान स्टुडिओ आहे.

महेश बाबू
साऊथचा क्यूट सुपरस्टार आणि ॲक्शन हिरो महेश बाबू मोठा स्टार आहे. महेश बाबूने सुद्धा ‘एशियाई महेश बाबू थिएटर्स’सह बिझनेसमध्ये एन्ट्री केली आहे. महेश आणि त्याची पत्नी नम्रता एका रेस्टॉरंटचे मालक आहेत.

राम चरण
RRR फेम अभिनेता राम चरण तेजा याच्या मालकीची TruJet नावाची एअरलाइन आहे. त्यांनी या विमान कंपनीचे नाव ट्रुजेट ठेवले आहे. अभिनेत्याचं कोनिडेला प्रॉडक्शन कंपनी नावाचं स्वत:चं प्रोडक्शन हाऊस देखील आहे. याशिवाय त्याची पत्नी अपोलो हॉस्पिटलची भागीदार आहे. त्याचं स्वत:चं हैदराबाद पोलो आणि रायडिंग क्लबही आहे.

थलपथी विजय
तामिळ सुपरस्टार थलपथी विजयचे तामिळनाडूमध्ये त्यांच्याकडे अनेक वेडिंग हॉल आणि कन्व्हेन्शन सेंटर आहेत. या सभागृहांना त्यांच्या कुटुंबीयांची नावं देण्यात आल्याचं सांगण्यात येतं. त्याच्या मालकीची श्रीलंकेतही काही थिएटर्स आहेत.

काजल अग्रवाल
साऊथची लोकप्रिय अभिनेत्री काजल अग्रवालचा Marsala ज्वेलरी ब्रँड आहे. या बिझनेसमध्ये तिची बहीण निशा तिची पार्टनर आहे.

आर्या
साऊथ स्टार आर्या हा अभिनेता सी शेल नावाच्या दक्षिण भारतीय रेस्टॉरंटचा मालक आहे. त्याचं ‘द शो पीपल’नावाचं प्रोडक्शन हाऊस देखील आहे. आपल्या या होम बॅनरअंतर्गत त्याने चित्रपटांची निर्मिती केली आहे.

श्रुती हसन
साऊथ अभिनेत्री आणि कमल हसन यांची लेक श्रुती हसन ही Isidro नावाच्या प्रॉडक्शन हाऊसची मालकीण आहे.

Leave a Comment

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप