स्टुडन्ट ऑफ द इयर यासारख्या मोठ्या बॅनर मधून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण करणारी आलिया भट सध्या टॉपची अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध झाली आहे! दरम्यान काही महिन्यांपूर्वीच तिने ऋषी कपूर यांचा मुलगा रणवीर कपूर याच्यासोबत लग्नगाठ बांधलेली आहे. कपूर फॅमिलीची सून बनलेली आलिया आलिया भट सध्या तिच्या प्रेग्नेंसी वरून पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
लग्नानंतर अगदी काही दिवसातच अभिनेता रणवीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट यांनी २७ जून २०२२ रोजी आपल्या प्रेग्नेंसी बाबतची बातमी सोशल मीडिया मार्फत जाहीर केली, तेव्हापासून सोशल मीडियावर त्यांच्या या गोड बातमी विषयी चर्चेला उधाण आलेले दिसत आहे!
यामुळेच रणवीर आणि आलीया या दोघांचेही अनेक फोटो सोशल मीडियावर जोरात व्हायरल होताना दिसत आहेत, यातच या फोटोंमध्येच आलियाचे लहानपणी ती गुटगुटीत असतानाचे विविध फोटोही सगळीकडे शेअर होताना दिसत आहेत!
लहानपणी क्युट दिसणाऱ्या आलियाचे फोटो व्हायरल झाल्यापासून तिच्या फॅन्स कडुन त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत! अनेकांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना असे म्हटले आहे की, “तिचं बाळ देखील तिच्यासारख असंच गुटगुटीत होईल!” असं त्यांना वाटत आहे, या व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये आलिया कधी तिच्या आई-वडिलांसोबत कधी परिवारासोबत तर कधी मित्र-मैत्रिणी सोबत पाहायला मिळत आहे आणि यासोबतच आलिया लहानपणी खूपच क्यूट असल्याची प्रतिक्रिया देखील अनेकांनी व्यक्त कली आहे.
एका युजरने तर ‘लहानपणी आलूभट्ट होती आणि आता आलिया भट्ट झाली’ अशा प्रकारच्या मजेदार कमेंटही तिच्या फोटोवर येत आहेत!
‘आवर बेबी कमिंग सून’ अशी पोस्ट लिहित आलिया आणि रणबिरने आपल्या चाहत्यांसोबत ही गोड बातमी सोशल मीडियावर शेअर केली होती!
सध्या आलिया आणि रणवीरचा ब्रम्हास्त्र नावाचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. याच्या ट्रेलरची सगळीकडे मोठी चर्चा गाजत आहे! अनेक नेटकऱ्यांचे तर असं म्हणणं आहे की या चित्रपटा दरम्यानच आलिया आणि रणवीरची केमिस्ट्री खऱ्या लाईफ मध्ये जुळण्यासाठी सुरुवात झाली होती!
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर लवकरच आई-वडील होणार आहेत. कपूर कुटुंबात एका छोट्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. आलियाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर फोटो शेअर करून चाहत्यांना ही खुशखबर दिली आहे. त्यांनी हॉस्पिटलमधील अल्ट्रासाऊंडचा फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये रणबीर कपूरही तिच्या शेजारी बसलेला दिसत आहे.