आलियाला लागले पाणीपुरीचे डोहाळे.. फोटो शेयर करून पुरवले डोहाळे..
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट- कपूर ही लवकरच आता आई होणार असल्याच्या बातमीने चाहत्यांना आनंद झाला आहे. खरतर लग्नानंतर काही महिन्यातच तिने गुड न्युज देत सर्वांना चकित केले. या बातमीने सर्वानाच अत्यानंद झाला आहे. दरम्यान, कपूर कुटुंबीय त्यांच्या या नव्या पाहुण्याच्या स्वागताची जय्यत तयारी करत आहेत. सध्या आलियाला डोहाळे लागल्याच्या बातम्या समोर येत आहेत. याचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. यामध्ये स्पष्ट होते आहे की आलियाला चक्क पाणीपुरी खाण्याचे डोहाळे लागले आहेत.
आलियाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये काही फोटो शेअर केले होते. मागचा रविवार तिने तिची मोठी बहीण शाहीन भट्टसह घालवला. यावेळी तिने शाहीनबरोबर चाट खाण्याचा मनसोक्त आनंद लुटला. याचेच फोटो तिने इन्स्टाग्रामवरून शेअर केले होते. या फोटोला तिने ‘पावर ऑफ पुरी’ असं कॅप्शन दिलं होतं. दुसऱ्या स्टोरीमध्ये आलियाने शेवपुरीचा फोटो शेअर करत #चाट डे लिहीत शाहीनलाही या स्टोरीमध्ये टॅग केलं होतं.
रणबीरसोबतच्या तिच्या लूक्स मुळे ते दोघे नेहमीच चर्चेत येत असतात. आकर्षक मुलाखतीसाठी आलिया सोशल मीडियावर नेहमीच ट्रेंड करत असते. काही काळापूर्वी, आलियाने टाइम 100 इम्पॅक्ट अवॉर्ड स्वीकारताना बेबी किकचा अनुभव घेतल्याबद्दल च अनुभव शेयर केला होता. यावेळी ती गोल्डन केप ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होती.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच आलियाच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमासाठी बॉलिवूडमधील सेलिब्रिटीही उपस्थित होते. आलिया-रणबीर त्यांच्या बाळासाठी सर्वच जण अधीर झाले आहेत. यावेळी भट आणि कपूर कुटुंबातील सर्वजण एकत्र आलेले दिसून आले. रणबीरने बाळासाठी काही वेळ ब्रेक घेणार असल्याचंही म्हटलं आहे.
या सोहळ्यासाठी आलियाने पिवळ्या रंगाची अनारकली निवडली होती ज्यामध्ये कमीत कमी गोट्टा किनारी वर्क होता. आलियाने तिच्या मायका आणि ससुराल बाजूने एक आनंदी फोटो देखील पोस्ट केला. तथापि, आलियाचे कोणतेही सेलिब्रेशन तिच्या मुलींशिवाय पूर्ण होऊ शकले नाही. फोटोंसोबत आलियाने लिहिले होते.
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत असलेला ‘ब्रह्मास्र’ चित्रपट सप्टेंबर महिन्यात प्रदर्शित झाला. या निमित्ताने पहिल्यांदाच आलिया-रणबीर ऑन स्क्रिन एकत्र दिसले. बॉक्स ऑफिसवर अजूनही हा चित्रपट चांगली कमाई करताना दिसत आहे. ‘ब्रह्मास्र’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यानही अनेकदा आलिया बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसून आली होती.