आलियाने चाहत्यांसोबत शेयर केला बेबी किकचा अनुभव.. म्हणाली, “आईपण करतेय एन्जॉय”

0

बॉलीवुड मधील आघाडीची अभिनेत्री म्हणून आलिया भट्ट सध्या प्रसिद्धीचे शिखर गाठत आहे. गंगुबाई काठियावाडीच्या भन्नाट यशानंतर आता तिच्या ब्रम्हास्त्र सिनेमाने साऱ्यांना वेडे केले आहे.दरम्यान तिने सर्वांना गोड बातमी देत आश्चर्याचा सुखद धक्का देखील दिला. दरम्यान यशाच्या शिखरावर असून आलिया तिच्या आयुष्यातील सर्वात आनंदी क्षण म्हणजे तिचे गरोदरपण एन्जॉय करत आहे. दरम्यान, ब्रम्हास्त्र सिनेमाच्या यशामुळे ती खूप आनंदी आहे. तसेच गरोदर महिलांना आराम करावा लागतो, पण आपलं बिझी शेड्युल सांभाळून ती काम करत आहे.

नुकताच तीला सिंगापूरमध्ये ‘टाइम 100 इम्पॅक्ट’ पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आले आहे. पुरस्कार स्वीकृती भाषणात आलियाने आपल्या तिच्या बाळाच्या गोंडस कृतीही चाहत्यांशी शेअर केल्या.

“माझ्या देशाची प्रतिनिधी म्हणून आज रात्री येथे आल्याचा मला खूप अभिमान वाटतो. एक देश ज्याने माझे आणि माझे करिअर दोन्ही घडवले आहे. एक देश म्हणून भारताचा गाभा आहे. विविधतेचे मूल्य इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा जास्त आहे आणि हे एक गाणे आहे जे मला जगभर गाण्याची आशा आहे.”शेवटी, जेव्हा प्रभाव पाडण्याची वेळ येते. मला आशा आहे की मी हे शक्य तितक्या मार्गाने करत राहीन परंतु आत्तासाठी, आज रात्री, या पुरस्काराने माझ्यावर आणि माझ्या लहान मुलावर खऱ्या अर्थाने प्रभाव पाडला आहे ज्याने माझ्या भाषणातून मला अथकपणे लाथ दिली. खूप खूप धन्यवाद, शुभ रात्री, “ती म्हणाली.

यासोबतच ती चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी स्वतः बद्दल कसा विचार करत होती आणि आता ती कशी आहे, याबाबत तिने सांगितले की , ‘जेव्हा तिने काम करायला सुरुवात केली, तेव्हा तीला असे वाटायचे की, एक दिवस ती जगावर राज्य करेल. ती असंही म्हणाली की, प्रत्येकाची अशी समजूत असते की, मी कोण आहे आणि मी किती मेहनती, हुशार, तेजस्वी आणि परिपूर्ण आहे. तसेच मला देखील परिपूर्ण व्हायचे होते आणि जगालाही दाखवून द्यायचे आहे माझ्यात किती पोटेन्शियल आहे.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर या वर्षी एप्रिल महिन्यात विवाहबद्ध झाले आणि आता ती लवकरच आई होणार आहे. यावर्षी तिचे गंगूबाई काठियावाडी, आरआरआर, डार्लिंग आणि ब्रह्मास्त्र हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. या साऱ्या चित्रपटांसाठी आलियाचे खूप कौतुक झाले आहे. ब्रह्मास्त्रानंतर ही अभिनेत्री रणवीर सिंगसोबत रॉकी आणि राणीच्या लव्हस्टोरीमध्ये दिसून येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप