माझे सिनेमे पाहू नका..स्टार किड्सना ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्यांवर कडाडली आलिया भट!

बॉलीवूड मधील गुणी अभिनेत्री आलिया भट सध्या तिचा येणारा सिनेमा ‘ब्रम्हास्त्र’ या चित्रपटामुळे तसेच तिच्या प्रेग्नेंसी मुळे देखील सोशल मीडियावर चर्चेत आलेली आहे! आलियाने लग्नानंतर आपल्या नावापुढे कपूर आडनाव लावल्याने तिला नेटकऱ्यांनी पुन्हा एकदा ट्रोल केल आहे. कित्येकदा आलियाला तिच्या कामामुळे किंवा पर्सनल लाईफ मधील घडामोडींमुळे नेटकर्यांच्या ट्रोलींगचा सामना करावा लागतो. पण यावेळी मात्र सर्व ट्रोलर्सला आलियाने अगदी सडेतोड उत्तर दिलं आहे!
“मी आवडत नसेल तर माझ्या सिनेमे पाहू नका” असे यावेळी आलिया म्हणाली आहे.

 

सध्या सोशल मीडियावर स्टार किड्सला ट्रोल करण्याची नवीनच टूम निघाली आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक स्टार किड्सना सतत ट्रोल करण्यात येत असते. आलियाने २०१२ रोजी करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलीवूडच्या चंदेरी दुनियेत पदार्पण केलं. आलिया तिच्या पहिल्यावहिल्या चित्रपटात मुख्य नायिकेच्या भूमिकेत असल्याने त्यावेळी देखील तिला ट्रोल करण्यात आलेले. एका मुलाखती दरम्यान आलिया म्हणाली की,
“माझे आई-वडील सिनेसृष्टीत काम करतात यात माझी काय चूक? उद्या जर कोणत्या अभिनेत्याच्या अभिनेत्रीच्या मुलांना सिनेसृष्टीत पदार्पण करायचा असेल तर त्यांना आधी स्वतःला सिद्ध करावे लागेल”

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt 🤍☀️ (@aliaabhatt)

ब्रह्मास्त्र मधून पहिल्यांदाच झळकणार रणवीर आणि आलियाची जोडी!

आलिया भट च्या प्रेग्नेंसीची बातमी ऐकून रणवीर आणि आलिया दोघांचेही फॅन खूपच आनंदित झाले आहेत. आलियाच्या प्रोफेशनल लाईफ बद्दल बोलायचे झाल्यास, काही दिवसांपूर्वीच आलियाचा डार्लिंग हा सिनेमा रिलीज झालेला आहे आणि आता लवकरच आलिया आणि रणबीरचा ब्रह्मास्त्र हा सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. या जोडीचा हा एकत्रितपणे पहिलाच चित्रपट असणार आहे. या सिनेमाच्या सेटवरूनच या दोघांची लव स्टोरी सुरू झालेली आहे.

आयान मुखर्जी दिग्दर्शित ब्रह्मास्त्र हा सिनेमा या दोघांसाठीही लकी ठरेल अशी अपेक्षा सर्वांना वाटत आहे. या सिनेमामध्ये रणबिर कपूर, आलिया भट यांच्याशिवाय अमिताभ बच्चन, चैतन्य अक्किनेनी हे कलाकार देखील मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहेत. काही महिन्यापूर्वीच रणवीर कपूरचा ‘शमशेरा’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला होता. मात्र कलेक्शन गोळा करण्यामध्ये हा सिनेमा काही खास जादू करू शकला नाही.

Leave a Comment

Close Visit Np online