लाल टिकली, हिरवी साडी अन् साधं मंगळसूत्र; लग्नानंतरचा अक्षयाचा हा लूक पाडतोय पेचात..
सध्या सोशल मीडियावर चर्चेत असणारा भन्नाट विषय म्हणजे हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांचे लग्न.. हळद ते संगीत आणि वरात ते लग्न विधी इथपर्यंत सर्वच सोहळ्याचे फोटोज् आणि व्हिडिओज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. दरम्यान, २ डिसेंबर रोजी या दोघांचा लग्न सोहळा दिमाखात पार पडला.
मराठमोळ्या पद्धतीच्या पेहरावात अक्षया आणि हार्दिक एकमेकांना अगदी शोभून दिसत होते. तस तर त्यांच्या प्रत्येक सोहळ्याच्या लुकची चर्चा नेटकऱ्यांमध्ये रांगलीच होती. पण आता चर्चा रंगत आहे ती तिच्या आफ्टर मॅरेज लूकची..लग्नानंतरच्या पहिल्या लुकमध्ये अक्षया खूप साधी आणि सोज्वळ दिसत आहे. तिच्या साधेपणानं सर्वांची मनं जिंकली आहेत.
दरम्यान, लग्नानंतर पहिल्यांदाच दोघांचा फोटो समोर आला आहे. अक्षयाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर करत चाहत्यांचे आभार मानले आहेत. तिने पोस्टमध्ये लिहले आहे राणा अंजलीला अपेक्षेपेक्षा जास्त प्रेम मिळाले. आमच्यावर प्रेम केलेत, जे सकारात्मक वातावरण तयार निर्माण झाले याने आम्ही भारावून गेलो आहोत. आमचं नाव आयुष्य सुरु होत आहे आम्हाला तुमच्या पाठिंब्याची गरज आहे. तसेच आम्ही लवकरच लग्नाचे आणखीन फोटो आणि व्हिडीओ शेअर करू, अशा शब्दात तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
View this post on Instagram
सध्या दोघांच्या लग्नाचे सुंदर फोटो सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होत आहेत. लग्नानंतरचा दोघांचा पहिला लुक समोर आला आहे.लाल टिकली, हिरवी साडी आणि साधं मंगळसूत्र असा अक्षयाचा लग्नानंतरचा सिंपल पण सुंदर लुक पहायला मिळत आहे.लग्नानंतरच्या अक्षयाच्या या सिंपल लुकचं सर्वत्र कौतुक होत आहे. इतर अभिनेत्रींपेक्षा अक्षया वेगळी ठरली आहे.लग्न मंडपातून बाहेर पडतानाही अक्षया फार सिंपल लुकमध्ये बाहेर पडताना दिसली.
View this post on Instagram
दरम्यान, अक्षयाने हार्दिकसाठी घेतलेला खास उखाणा व्हायरल झाला आहे. तर तिच्या तोडीस तोड हार्दिकनेही भन्नाट उखाणा घेत सर्वांना चाट पाडले. हार्दिक उखाणा घेत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. “पाहा आमच्या गुरुजींनी मांडले आहेत समोर चार पाठ, अक्षयाचं नाव घेतो आता बघा आमच्या लग्नाचा थाट.” अगदी हसतमुख चेहऱ्याने हार्दिकने हा उखाणा घेतला.
हार्दिकने उखाणा घेताच अक्षयाही अगदी लाजली. तसेच दोघांच्या चेहऱ्यावरील हास्य अगदी पाहण्यासारखं आहे. या दोघांच्या लग्नाला कलाक्षेत्रातील अनेक मंडळींनी हजेरी लावली होती. तसेच अनेकजण हार्दिक व अक्षयावर त्यांना नव्या वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.