“मी तयारच नव्हते पण..” लग्नाबाबत अक्षयाने केला जबरदस्त खुलासा ऐकून व्हाल हैराण..

गेल्या महिन्याभरापासून अभिनेता हार्दिक जोशी व अभिनेत्री अक्षया देवधर यांच्या लग्नाच्याच बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. बघता बघता या जोडप्याच्या लग्नाला महिना पूर्ण झाला. यानिमित्त अक्षयाने एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अक्षयाने एक मोठा खुलासाही केला आहे. जो ऐकून चाहते हैराण झाले आहेत.काय आहे हा खुलासा जाणून घ्या..

अक्षयाने शेयर केलेल्या या व्हिडीओमध्ये अक्षया व हार्दिक दोघंही लग्नाआधीच्या लव्हस्टोरीवर बोलत आहेत. लग्नासाठी विचारल्यावर होकार देण्यासाठी अक्षयाने सहा महिन्यांचा वेळ घेतला होता. यामागचं कारण अक्षयाने स्पष्ट केले आहे.

ती व्हिडीओत सांगत आहे की,‘तो मला विचारणार खरं तर याची थोडी कल्पना आधीच आली होती. काय घडतंय किंवा समोरचा काय बोलणार, याचा अंदाज येतोच. त्यामुळे फार काही अनपेक्षित नव्हतं. त्याला काय वाटतंय, हे मला कळलं होतं. पण हो, हार्दिक थेट लग्नाचं विचारणार, असं वाटलं नव्हतं. आधी मी तयार नव्हते. त्यामुळे मला उत्तर द्यायला थोडा वेळ लागला. पण मलाही माहित होतं की मी होच म्हणणार आहे. त्यामुळे सगळं कसं व्यवस्थित पार पडलं.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr)

यावर हार्दिक म्हणाला, तुझ्यात जीव रंगला’ मालिका संपल्यानंतर लग्नाचं वय झालं आहे, असं मला घरुन सांगण्यात आलं. अक्षयाला लग्नासाठी विचार, असं आई म्हणाली. त्यामुळे आमच्या लग्नाचं क्रेडिट माझ्या आईला जातं. मी प्रपोज केल्यानंतर अक्षयाने लगेच उत्तर दिलं नाही. तिने सहा महिन्यांचा वेळ घेतला. मालिका संपल्यानंतर आमचा एकमेकांमध्ये जीव रंगला…, असं हार्दिक म्हणतो. यावेळी हार्दिक अक्षयाला ‘मेरे सपनों की रानी’ हे गाणं समर्पित केलं.

दरम्यान एका कार्यक्रमात त्याने सांगितले होते की,, ‘एक दिवस माझी आई माझ्याकडे आली. ‘एकदा विचारुन बघ ना. मी तसंही तिला (अक्षयाला) एकदा विचारलं आहे. तू जरा परत विचारुन बघ, असं ती मला म्हणाली. मी अवाक् झालो होतो. मी तिला समजावलं. अगं आई, मी विचारलं ना तर ती माझ्याशी जेवढं बोलते तेवढंही बोलणार नाही. तेही बंद करेल. प्लीझ नको…, असं मी म्हणालो. त्यावर आई हट्टालाच पेटली. अरे प्लीज विचारून बघ ना, म्हणून मागेच लागली. अखेर आईच्या इच्छेखातर, एकदा विचारूनच बघू, असा विचार मी केला. मग मी तिला थेट जाऊन विचारलं.

सोबतच व्हिडीओत हार्दिक व अक्षयाच्या लग्नाचे खास क्षण पाहायला मिळत आहे. ज्यामधे त्यांचे गोड आणि खास क्षण अचूकपणे टिपले गेले आहेत.

Leave a Comment

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप