फ्लॉप चित्रपटांची जबाबदारी घेत अक्षय कुमारने घेतला मोठा निर्णय…इतर कलाकारांवर होणार परिणाम..
बॉलीवुड ने आजवर प्रेक्षकांचे अविरतपणे मनोरंजन केले आहे. पण गेल्या काही काळापासून बॉलीवूडला उतरती कळा लागली आहे असे म्हणणं वावगे ठरणार नाही. कारणही तसेच आहे, गेल्या काही काळात दाक्षिणात्य सिनेमांनी चाहत्यांना भुलवले आहे.
त्यामुळे त्याचा परिणाम हिंदी चित्रपटांवर नक्कीच झाला आहे. आणि याचा फटका बॉलीवूडमधील दिग्गज कलाकारांना देखील बसला आहे. या यादीत अक्षय कुमारचे नाव समोर आले आहे. दरम्यान, त्याचे सम्राट पृथ्वीराज, बच्चन पांडे, रक्षाबंधन यांसारखे बिग बजेट सिनेमे फ्लॉप ठरले आहेत.
यावर उपाय म्हणून त्याने एक मोठा निर्णय घेतला आहे. ज्याचा परिणाम इतर कलाकारांवर होऊ शकतो.
सर्वांना माहीतच आहे की, अक्षय कुमार हा बॉलीवूड मध्ये सर्वात जास्त फी आकारणारा अभिनेता आहे. पण आता आगामी चित्रपटांमध्ये त्याने आपली फी कमी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. एका चित्रपटासाठी ७५ कोटी घेणारा अक्षय आता फक्त ९ ते १८ कोटी फी घेणार असल्याचे त्याने जाहीर केले आहे. पण ज्या चित्रपटांचा तो निर्माता नसेल, त्यांच्या नफ्यात तो ५० टक्के वाटेकरी असेल. अक्षय ज्या चित्रपटांचा निर्माता आहे त्यातील ८० ते ८५ टक्के नफा तो घेतो. यामुळेच पॅडमॅनसारख्या छोट्या बजेटच्या चित्रपटाने ६० कोटींची कमाई केली असली तरी अक्षयला त्याचा मोठा फायदा झाला होता. त्याच्या या निर्णयामुळे आता बॉलीवुड मध्ये काय उलथापालथ होईल तो येणारी वेळच सांगेल.
अलीकडेच मुलाखती दरम्यान ती म्हणाला होता, त्याचे चित्रपट फ्लॉप होण्याची जबाबदारी तो स्वत: घेतो. चित्रपट पडल्यावर निर्मात्यांना त्याचा खूप त्रास होतो. रक्षाबंधन फ्लॉप झाल्यानंतर त्याने स्पष्टपणे सांगितलं की, माझे चित्रपट फ्लॉप होत असतील तर याला कुठेतरी मीही जबाबदार आहे. या सर्व बाबी पाहता त्याने कमी फी घेण्याचा निर्णय घेतल्याचं चित्रपटसृष्टीत चर्चा होत आहेत.
आता अक्षय कुमारने चित्रपट फ्लॉप होण्याची जबाबदारी स्वतःवर घेंतल्यानंतर फी कमी केल्यानंतर आता निर्मात्यांच्या नजरा इतर स्टार्सवरही लागल्या आहेत. अनेक निर्मात्यांनी स्टार्सनी त्यांची फी कमी करावी अशी मागणी करायला सुरुवात केली आहे. स्टार्सची फी इतकी जास्त आहे की पन्नास ते साठ टक्के चित्रपट त्यातच जातो. त्यामुळे आता आणखी कोणते कलाकार आपल्या फिमध्ये कपात करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.