५२ व्या वर्षीही चिरतरुण… निखळ हास्याने जिंकले ऐश्वर्या नारकरने चाहत्यांचे मन..

मराठी सिनेमा सृष्टीतील चिरतरुण अभिनेत्रींनी आजही त्यांच्या सौंदर्याने अनेकांना भुरळ घालण्यात पुढे आहेत. मराठी सिनेमा आणि सुंदरता यांचं समीकरण फार काळापासून चालत आले आहे. सुंदर, सालस आणि संस्कारी महाराष्ट्रीयन स्त्री म्हणून मराठी अभिनेत्रींनी आपल्या संस्कृतीची जाण राखत नेहमीच चाहत्यांचे मनोरंजन केले आहे. तेव्हा काय नि आता काय साडी आणि अभिनेत्री म्हणजे सुंदरता हे गणितच मनोरंजनाला चार चाँद लावत आले आहेत. पण अलीकडच्या काळात पाश्चात्य संस्कृतीचा हात धरून नव्या फॅशन ने चित्रपट सृष्टीवर देखील आपला परिणाम दाखवला. पण असे असले तरीही आपल्या संस्कृतीला जपत सौंदर्याने चाहत्याने चारी खाने चित करणाऱ्या ऐश्वर्या नारकरने पुन्हा एकदा चाहत्यांना भुरळ पाडली आहे.

मराठी मालिका, नाटक, सिनेमामधील सर्वात आकर्षक आणि लाडकं नाव म्हणजे ऐश्वर्या नारकर… देशच काय तर परदेशातही आपल्या अभिनयाने अनेक चाहत्यांना आपलेसे केले. शांत सौम्य आणि तितकीच सुंदर अशा या अभिनेत्रीचे रंगभूमी वर असलेले प्रेम नेहमीच तिने सिद्ध केले आहे. सध्या ती छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाने जादू करते आहे. तिने ‘या सुखांनो या’ मालिकेत साकारलेली हळवी भूमिका असो की ‘लेक माझी लाडकी’ मालिकेत चितारलेली नकारात्मक भूमिका , तिच्या या भूमिकांना प्रेक्षकांनीही तितकेच भरभरून प्रेम दिले. आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aishwarya Narkar (@aishwarya.narkar)

आणि आता मालिकांसोबतच तिने सोशल मीडियावरही आपल्या अदाकारीने नेट कऱ्याना वेड लावले आहे. ती सतत सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते. दरम्यान, सोशल मीडियावर ‘अस्सल भारतीय नारी’ रूपात ऐश्वर्या नारकर साडी नेसून फोटो पोस्ट करतात.ऐश्वर्या नारकर यांना सर्व प्रकारच्या साड्यांची आवड आहे, अगदी रेट्रो स्टाईल किंवा अस्सल पेशवाई नऊवारी असो सर्व रूपात त्यांचं सौंदर्य चांगलच उठावदार दिसते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aishwarya Narkar (@aishwarya.narkar)

ऐश्वर्याने वयाच्या ५२व्या वर्षी सुद्धा स्वतःला अगदी फिट ठेवले आहे. तिला व्यायामाचीही प्रचंड आवड आहे.निखळ हास्य, मोकळे लांब केस आणि वाऱ्यावर उडता पदर या रूपातील ऐश्वर्यावर तिचे चाहते पूणर्पणे फिदा आहेत. तिचे सोशल मीडियावर १ लाखाहून अधिक फॉलोवर्स आहेत.ऐश्वर्या नारकरने अनेकदा तिचे पती अविनाश नारकर व मुलगा अमेय नारकर यांच्यासोबत रील्स सुद्धा शेअर केल्या आहेत. ऐश्वर्या नारकरच्या साडीचे कलेक्शन पाहून अनेकदा त्यांना साडीचा व्यवसाय करण्याचा सल्लाही त्यांच्या महिला चाहत्या देत असतात.

Leave a Comment

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप