ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघातील सर्वात धोकादायक फलंदाजांपैकी एक असलेल्या डेव्हिड वॉर्नरचे भारतावर किती प्रेम आहे, हे आता कोणापासून लपून राहिलेले नाही. डेव्हिड वॉर्नरने अनेक प्रसंगी भारताची स्तुती केली आहे, यासोबतच तो प्रत्येक भारतीय सण आणि प्रथा चांगल्या प्रकारे साजरे करतो.
अनेकदा पत्रकारांनी डेव्हिड वॉर्नरला भारतावरील प्रेमाचे कारण विचारले असता वॉर्नर म्हणाला की, भारत माझे दुसरे घर आहे आणि येथे आल्यानंतर मला माझ्याच देशात असल्यासारखे वाटते.
अलीकडेच डेव्हिड वॉर्नरने असे काही केले आहे, जे पाहून प्रत्येक भारतीय त्याचे कौतुक करत आहे. खरं तर गोष्ट अशी आहे की डेव्हिड वॉर्नरने त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर केली आहे आणि ती पोस्ट पाहून प्रत्येक भारतीयाची छाती रुंद झाली आहे.
23 ऑगस्ट हा दिवस आता भारतीय इतिहासात कायमचा अजरामर झाला आहे हे तुम्हाला माहीत आहेच. या दिवशी इस्रोने पाठवलेल्या चांद्रयान-३ ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग केले आहे. चांद्रयान-३ ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग केल्याची बातमी इस्रोने शेअर करताच संपूर्ण जगाने भारताच्या वैज्ञानिकांचे कौतुक केले आहे.
डेव्हिड वॉर्नरनेही त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून चांद्रयान-३ च्या यशस्वी लँडिंगबद्दल संपूर्ण भारताचे अभिनंदन केले आहे. डेव्हिड वॉर्नरने ही पोस्ट शेअर करताच त्याच्या भारतीय समर्थकांनी त्याचे कौतुक केले आणि त्याच्या पोस्टवर कमेंट करण्यास सुरुवात केली. एका यूजरने तर लिहिलं आहे की, आता तुम्ही भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज करा.