रिलेशनशिप नंतर आता चर्चा रंगली रश्मिकाच्या टॅटूची…जाणून घ्या काय अर्थ या टॅटूचा..

0

साऊथ इंडस्ट्रीमधून आपल्या अनोख्या अंदाजाने अल्पावधीतच अख्ख्या देशाला आपले वेडे करण्यात अभिनेत्री रश्मिका मंदानाने बाजी मारली आहे. दरम्यान, पुष्पा द राईज या सिनेमातून तिने साकारलेली श्रीवल्ली आजही प्रत्येकाला तिच्या तालावर नाचवत आहे.

दरम्यान आता रश्मिका मंदाना लवकरच बॉलिवूड डेब्यू करतेय. तिचा ‘गुडबाय’ हा सिनेमा रिलीजसाठी एकदम तयार आहे. या चित्रपटात रश्मिका बॉलीवुड चे बिग बी म्हणजेच अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रीन शेअर करतेय. सध्या या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. याशिवाय आणखीही एका गोष्टीची जोरदार चर्चा रंगलीये ती म्हणजे रश्मिकाच्या टॅटूची.

नुकताच रश्मिकाचा एक जुना लाईव्ह सेशन व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. यात ती तिच्या टॅटूबद्दल बोलताना आढळली आहे. रश्मिकाच्या उजव्या हातावर मनगटाच्या खाली एक टॅटू गोंदवला आहे. जो चाहत्यांचे लक्ष वेधत आहे. या टॅटूमध्ये तिने एक इंग्रजी शब्द हातावर कोरलेले दिसत आहेत. रश्मिकाच्या अनेक फोटोत तिचा हा टॅटू हमखास दिसतो.

पण चाहत्यांना वाटत आहे की,रश्मिकाने हा टॅटू तिच्या एक्स बॉयफ्रेंडच्या आठवणीत काढला आहे. पण असं अजिबात नाहीये.रश्मिकाने टॅटूमध्ये Irreplaceable लिहिलेलं आहे. आता त्याचा अर्थ काय? असा प्रश्न चाहत्यांना पडला असेल.

दरम्यान, रश्मिकाच्या लाईव्ह सेशनदरम्यान् एका चाहत्याने रश्मिकाला नेमका हाच प्रश्न केला होता. तुझ्या हातावरील टॅटूचा अर्थ सांग, अशी रिक्वेस्ट केली होती. त्यावेळी रश्मिकाने या टॅटूचा अर्थ सांगितला होता.

ती म्हणाली होती, मी माझ्या हातावर Irreplaceable असा इंग्रजी शब्द लिहिला आहे. याचा अर्थ होतो स्थिर. असं काही जे कधीच बदलता येत नाही. मी Irreplaceable आहे. आपल्यापैकी प्रत्येकजण वेगळा आहे, अद्वितीय आहे. तुम्हाला कोणतीही अन्य व्यक्ती रिप्लेस करू शकत नाही.मीडिया रिपोर्ट्सनुसार रश्मिकाने हा टॅटू कॉलेजमध्ये असताना बनवला होता. या टॅटूचा रश्मिकाच्या लव्ह लाईफशी काहीही संबंध नाही. तो तिने स्वत:साठी, स्वत:ला डेडिकेट केलेला टॅटू होता.

रश्मिकाच्या ‘गुडबाय’ हा सिनेमा येत्या ७ ऑक्टोबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या चित्रपटातील तिचे हिक साँग रिलीज झाले आहे. ज्याला खूप प्रसिद्धी मिळत आहे. बॉलिवूडमध्ये रश्मिका सिद्धार्थ मल्होत्रासोबतही दिसणार आहे. ‘मिशन मजनू’ या चित्रपटात रश्मिका व सिद्धार्थ मल्होत्रा ही जोडी ऑनस्क्रीन रोमान्स करताना झळकणार आहे. चाहते तिला हिंदी सिनेमात काम करताना पाहण्यासाठी कमालीचे उत्सुक आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.