घटस्फोटाच्या बातमीनंतर मानसीची ती पोस्ट होतेय व्हायरल..

0

मराठी सिनेसृष्टीत आपल्या मेहनत आणि अजोड सौंदर्याच्या जोरावर संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणारी लावण्यवती म्हणजे मानसी नाईक. आपल्या नृत्य कौशल्याच्या जोरावर सिनेसृष्टीत पाऊल टाकलेली मानसी आज अनेक चित्रपटात लीलया कोणतीही भूमिका साकारतेय. तिचा अफलातून डान्स बघण्यासाठी चाहते सीनेमागृहात गर्दी केल्यावाचून राहत नाहीत.

मानसी कायमच आपल्या अभिनयानं सगळ्यांची मनं जिंकत असते. ती अनेकदा चर्चेतही आली आहे. पण गेल्या काही दिवसांपासून तीच्यांबत धक्कादायक बातमी समोर येत आहे ज्यामुळे तिचे चाहते चिंतेत पडले आहे. दरम्यान मानसी घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

मानसी नाईक आणि तिचा नवरा प्रदीप खरेरामध्ये काहीतरी बिनसलं असल्याचं समोर आलं आहे. या चर्चांदरम्यान मानसीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंट वर केलेली पोस्ट सर्वांना आकर्षित करते आहे. या पोस्टमध्ये मानसीने साडीतील सुंदर फोटो शेअर केले असून सोबतच एक कविताही शेअर केली आहे. तिच्या फोटोंनी आणि कवितेने सध्या इंटरेटवर अक्षरशः वादळ आले आहे. तिने पोस्ट शेयर केलेली कविता काहीशी अशी आहे. 

“देवासमोर उभा होतो,

हताश मी हात जोडून..

डोळ्यामध्ये पाणी होते,

मनातून पूर्ण मोडून..

“देवा !”

मी म्हणालो,

“काय करू कळत नाही”…

“प्रश्नाच उत्तर मिळत नाही”

“विश्वास ठेव”

देव म्हणाला..

“देवा सगळेच रस्ते बंद आहेत

आशेचे दिवे मंद आहेत”

“विश्वास ठेव”

देव म्हणाला..

“देवा आज असं वास्तव आहे

जिथे आशेचा किरण नाही

उद्या काही छान असेल

असा आजचा क्षण नाही

तर कशावर मी विश्वास ठेवावा

जगामध्ये विश्वास आहे

याचा तुझ्याकडे काय पुरावा ? ”

शांतपणे हसत देव मला म्हणाला

“पक्षी उडतो आकाशात,

आपले पंख पसरून

विश्वास असतो त्याचा, खाली न पडण्यावर”

“मातीमध्ये बी पेरतो, रोज त्याला पाणी देतो

विश्वास असतो तेव्हा तुझा रोप जन्म घेण्यावर”

“बाळ झोपते खुशीत, आईच्या कुशीत,

विश्वास असतो त्याचा, तिने साम्भाळून घेण्यावर”

“उद्याचे बेत बनवतो, रात्री डोळे मीटतो,

विश्वास असतो तेंव्हा तुझा पुन्हा प्रकाश होण्यावर”

“आज माझ्या दारी येऊन, आपलं मनातलं दुखः घेऊन,

विश्वास आहे तुझा कारण मी हाक ऐकण्यावर”

“असाच विश्वास जागव मनात, परिस्थिती बदलते एका क्षणात”

“आजची स्थिती अशीच राहील,असं कुठेही लिहिलेल नाही

उद्याच चित्र कसं राहील, तू काहीच पाहीलेल नाही”

“जिथवर तुझी दृष्टी आहे, त्याही पुढे सृष्टी आहे”

“तुझ्या बुद्धीच्यापलीकडेही बऱ्याच गोष्टीघडत असतात

आशेचे तुटलेले धागे तुझ्या नकळत जोडत असतात”

“तुझ्या नकळत तुझ्यासमोर, असा एक क्षण येईल,

ज्याची आशा सोडली होतीस, ते स्वप्न खरं होईल”

“म्हणून….सगळे रस्ते बंद होतील

तेंव्हा फक्त ‘विश्वास ठेव’

जिथे संपते मर्यादा तुझी,

तिथून साथ देतो देव..!!!”

तिच्या या पोस्ट ने सर्वांचे लक्ष वेधले आहे. तिच्या आणि पती प्रदीप मधील मतभेद लवकर मिटूदे अशी प्रार्थना चाहते करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Manasi Naik (@manasinaik0302)

Leave A Reply

Your email address will not be published.