घटस्फोटाचा खुलासा केल्यानंतर मानसीने केले अनेक फोटोज् पोस्ट.. नेटिझनस झाले अवाक..

0

मराठी सिनेसृष्टीमध्ये आपल्या दिलफेक अदाकारी आणि अफलातून डान्स ने चाहत्यांना मोहिनी घालणारी मानसी नाईक सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. तिचं सध्या चर्चेत येण्याचे कारण म्हणजे तिचा होणारा घटस्फोट.. मानसी ही सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असल्याचे दिसते. दरम्यान ती नेहमी तिच्या सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत मानसी चाहत्यांशी तिचे काही खास क्षण शेयर करत असते.

नुकतंच मानसीनं एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला दिलेल्या कॅप्शनमुळे मानसी आणि तिचा पती प्रदीप खरेरामध्ये यांच्यामध्ये दुराव निर्माण झाला या गोष्टीवर शिक्कामोर्तब झाला आहे. ती लवकरच घटस्फोट घेणार आहे. मानसीने घटस्फोटासाठी अर्ज दिल्याचे एका मुलाखतीदरम्यान स्पष्ट केले आहे. मानसीने स्वत: त्यांच्यात काय बिनसले याचा खुलासा करण्यासाठी ही खास पोस्ट केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Manasi Naik (@manasinaik0302)

गेल्या काही दिवसांपासून मानसी नाईक तिच्या वैयक्तिक आयुष्यात आलेल्या वादळामुळे चर्चेत आहे. नुकतेच एका मुलाखतीमध्ये तिने या घटस्फोटाचे कारण सांगितले आहे. या मुलाखतीत मानसी नाईकने पहिल्यांदा मागच्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या घटस्फोटाच्या चर्चांवर मौन सोडलं आहे.

“माझ्या घटस्फोटाबद्दल सुरू असलेल्या चर्चा खऱ्या आहेत. मी खोटं बोलणार नाही. मी घटस्फोटासाठी अर्ज दिला आहे आणि यासंबंधी प्रक्रियेला आता सुरुवातही झाली आहे. मी आता या क्षणाला खूपच दुःखी आहे.” असे तिने म्हटले होते. त्यानंतर मानसी नाईकने तिच्या घटस्फोटामागची कारण सांगितली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Manasi Naik (@manasinaik0302)

एखादे नाते टिकवण्यासाठी तुम्ही तुमच्याकडून १०० टक्के द्या. पण काही काळाने ही गोष्ट जर तुमच्या स्वाभिमानावर आली असेल तर अशा टॉक्झिक नात्यापासून लांब राहणे योग्य असं ही ती म्हणाली.

अभिनेत्री मानसी नाईक नवरा प्रदीपबरोबर घटस्फोट घेत असल्याचा खुलासा तिनं केला आहे.मानसी घटस्फोटामुळे सातत्यानं चर्चेत आहे.मानसी आणि प्रदीप यांच्यात खटके उडाल्यानं आणि नात्यात रिस्पेक्ट, प्रोत्साहन मिळत नसल्यानं तिनं त्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे, असं तिनं सांगितलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Manasi Naik (@manasinaik0302)

दरम्यान मानसीचा एकदम कडक हा सिनेमा रिलीज होणार आहे. सिनेमाच्या प्रमोशनमध्ये मानसी बिझी आहे.मानसी सोशल मीडियावर हटके फोटो शेअर करत खोचक पोस्ट शेअर करताना दिसत आहे.चांगला गेम खेळणाऱ्या मुलींबरोबर गेम खेळू नका’, असं म्हणतं मानसीनं पोस्टमधून खोचक सल्ला दिला आहे.मानसीचे नेहमीप्रमाणे ग्लॅमरस फोटो तिनं शेअर केलेत. ज्याला चाहत्यांची पसंती मिळत आहे.घटस्फोट होणार असला तरी मानसीला सध्या तिच्या करिअरवर फोकस करायचा आहे असं तिनं सांगितलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.