कपिल शर्मा शो सोडल्यावर सुनील ग्रोव्हर वर आली शेंगदाणे विकण्याची वेळ? सोशल मीडियावर व्हिडियो झाला व्हायरल..

0

विनोदबुद्धी आणि समोरच्याला हसवण्याचे कसब प्रत्येकाच्या अंगी असणे सोप गोष्ट नाही. पण हे कसब अंगी असणारे काही कलाकार आहेत ज्यांनी लोकांना पोट धरून हसायला भाग पाडले आहे. आणि असाच लोकप्रिय विनोदी कलाकार म्हणजे सुनील ग्रोव्हर… तो नेहमीच चर्चेत येत राहतो शिवाय तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर ॲक्टीव्ह तो नेहमी त्याचे विविध फोटो आणि मजेशीर व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असतो. त्याच्या विनोदाचे अनेक फॅन असून तो आपल्या चाहत्यांना हसवण्याची एकही संधी सोडत नाही. अशातच कॉमेडियन सुनील ग्रोवरची एक पोस्ट समोर आलीये ज्यामध्ये तो रस्त्यावर शेंगदाणे विकताना दिसत आहे. त्याच्या या व्हिडीओने सध्या सोशल मीडियावर तुफान माजवले आहे. ज्यामुळे नेट कऱ्यांच्या चर्चेला उधाण आले आहे.

सुनील ग्रोवरने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सुनील रस्त्यावर शेंगा भाजताना आणि शेंगदाणे विकताना दिसत आहे. त्याचा हा व्हिडीओ पाहून चाहते थोड्यावेळासाठी संभ्रमात पडले आहेत की, एवढ्या मोठ्या अभिनेत्यावर शेंगदाणे विकण्याची वेळ कसं काय आली? सुनीलची हा व्हिडीओ काही वेळातच इंटनेटवर धुमाकूळ घालताना दिसला. अद्यापही या व्हिडीओची चर्चा होतीये. पोस्ट शेअर करत सुनीलने लिहिले, ‘खा खा खा’.

एका यूजरने कमेंटमध्ये लिहिले की,’कपिल शर्मा शो सोडल्यानंतर ही परिस्थिती झालीये, पत्ता सांगा आम्ही पण येतो, शेंगदाणे कितीला दिले भैया, परत कपिल शर्मा शोमध्ये या’, “ दुसर्‍या वापरकर्त्याने लिहिले, “शेंगदाणे घेऊन जाण्याचा विचार करा आणि तेथे द सुनील ग्रोव्हरला भेटा.” ते.

सुनील ग्रोव्हरचे इन्स्टाग्रामवर ५.४ दशलक्ष लोक त्याला फॉलो करतात. त्याचबरोबर ती जेव्हाही कोणतीही पोस्ट शेअर करते तेव्हा तिचे चाहते उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया देतात. सुनीलने हा व्हिडीओ फक्त चाहत्यांच्या मनोरंजनासाठी शेअर केला आहे. असे अनेक व्हिडीओ तो कायमच शेअर करत असतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunil Grover (@whosunilgrover)

दरम्यान, द कपिल शर्मा शो सोडल्यानंतर सुनील ग्रोवर आता चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारताना दिसतो. नुकत्याच आलेल्या गुडबाय चित्रपटात तो दिसला होता. तो लवकरच जवान चित्रपटाती दिसणार आहे. सुनीलला अजून कपिल शर्मामध्ये परत येण्यास चाहते विनंती करत असतात. त्याचं डॉ. मशहूर गुलाटी पात्र प्रेक्षकांना खूप आवडायचं. असूनही प्रेक्षक त्याला शोमध्ये मीस करतात. कपिल आणि सुनीलमध्ये वाद झाल्यामुळे सुनीलने हा शो सोडला होता. मात्र आता त्यांचे नाते आता सुधारत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे दोघे चांगले मित्र तर आहेत मात्र एकत्र काम करणं थोडं अवघड आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप