छोटया पडद्यावरील वादग्रस्त आणि सर्वात लोकप्रिय रिॲलिटी शो म्हणजे बिग बॉसच्या ४.. या सिझनबाबत सोशल मीडियावर अगदी रंजक अशी चर्चा रंगली होती. दरम्यान, बिग बॉस च्या चौथ्या सिझनची घोषणा झाली आहे. आणि आता नव्या घराचा लूकदेखील समोर आला आहे. यावेळी १६ सहभागी स्पर्धक कोण असतील याची चर्चा सुरू असतानाच, एका अभिनेत्याबाबत शिक्कामोर्तब केलेला पाहायला मिळतो आहे.
+कलर्स मराठीवरील एका लोकप्रिय मालिकेतून नायकाची एक्झिट करण्यात आली आहे. त्यामुळे हा नायक बिग बॉसच्या घरात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलेले पाहायला मिळत आहे. ही मालिका दुसरी तिसरी नसून सुंदरा मनामध्ये भरली ही आहे. या मालिकेने काही वर्षांचा लीप घेतला आहे.
View this post on Instagram
दरम्यान, सोशल मीडियावर सुंदरा मनामध्ये भरली मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. ज्यामध्ये दिसून येत आहे प्रोमोमध्ये लतिकाच्या गळ्यात मंगळसूत्र दिसत नाहीय. त्यामुळे पुढच्या नव्या भागात अभिमन्यू मालिकेत दिसणार नाही हे नक्की झालंय
यात अभिमन्यूचा मृत्यू झाल्याचे दाखवण्यात आले आहे. त्यामुळे अभिमन्यू नंतर लतिका आपल्या लेकीचा सांभाळ करताना दर्शवली आहे. मालिकेतला हा ट्विस्ट असेच काहीसे संकेत देताना दिसत आहे. अभिमन्यूची अचानक एक्झिट याच कारणामुळे झाली असावी. त्यामुळे मालिकेच्या कथानकात मोठा बदल करावा लागला असल्याचे आता बोलले जात आहे.
अभिमन्यूची भूमिका समीर परांजपे याने अभिनयाने चांगलीच वठवली होती. या दोघांची आगळी वेगळी प्रेमकहाणी प्रेक्षकांना विशेष भावली होती. मालिकेत अभिमन्यू म्हणून घराघरात पोहोचलेला समीर सोशल मीडियावर सक्रिय आहे. आपले कामाचे, वैयक्तिक फोटोज व्हिडिओ तो शेअर करत असतो. आषाढी एकादशीला त्यानं गायलेलं विठ्ठलाचं गाणं चाहत्यांना आवडलं होतं. व्हिडिओत तो ‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ हे गाणं गाताना दिसला. साडेतीन मिनिटांच्या या व्हिडिओ समीर अतिशय भक्तिभावानं विठुरायाचं हे गाणं गाताना आपल्याला दिसला.
आता समीर परांजपे हा मराठी बिग बॉसच्या ४ थ्या सिजनचा पहिला स्पर्धक असेल असा शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. त्यामुळे समीर ह्या बिग बॉसच्या घरात प्रेक्षकांच्या समोर स्वतःची ओळख कशी बनवेल याची जास्त उत्सुकता आहे. हार्दिक जोशी, अलका कुबल, रुचिरा जाधव, तुषार गोसावी, तेजश्री जाधव हे सेलिब्रिटी सहभागी होतील असे बोलले जात आहे. ही संभाव्य यादी असली तरी त्यांच्या नावावर खात्रीशीर शिक्कामोर्तब केला असल्याचे सांगण्यात येत आहे.