डिलिव्हरी नंतर या मालिकेतून कमबॅक करायला मीनाक्षी झाली तयार.. पोस्ट करत बातमी केली शेयर..

0

छोट्या पडद्यावर अनेक मालिका गाजत असतात. या मालिकेतील मुख्य पात्रे जरी आकर्षण असले तरी भूमिका छोटी असली आपल्या अनोख्या शैलीने ते प्रेक्षकांचे मन जिंकण्यात यशस्वी ठरतात. असच आपल्या छोट्याशा पण महत्वपूर्ण भूमिकेने चाहत्यांना भुरळ पाडणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे मीनाक्षी राठोड.

स्टार प्रवाह वाहिनीवरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत मीनाक्षीनं देवकीचे पात्र उत्तमरीत्या साकारले होते. तिची ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली. मीनाक्षीनं तिच्या अभिनयानं सर्वांची मनं जिंकली. मात्र डिलिव्हरीमुळे तिला मालिकेतून ब्रेक घ्यावा लागला. पण मीनाक्षी प्रेग्नंसीच्या काळातही शेवटच्या महिन्यापर्यंत मालिकेचं शुटींग करत होती. मुलीच्या जन्मानंतर मीनाक्षीनं कामातून ब्रेक घेतला होता. मात्र आता पुन्हा त्याच जोशात मीनाक्षी नव्या मालिकेतून कमबॅक करणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत.

अभिनेत्री मीनाक्षी आणि तिचा नवरा अभिनेता कैलास वाघमारे यांना मे महिन्यात कन्यारत्न प्राप्त झालं. दोघांनीही सोशल मीडियावर मुलीचा फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेयर केली आहे. मीनाक्षी आणि कैलास नेहमीत मुलीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. मीनाक्षीच्या युट्यूब चॅनेलवर ती मुलीबरोबरचे व्लॉग्स शेअर करत असते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Meenakshi Rathod (@meenakshirathod17)

मीनाक्षीनं लेकीच्या जन्मानंतर तीन महिन्यांनी म्हणजेच ऑगस्ट महिन्यात लेकीचं बारसं केलं. कैलास आणि मीनाक्षीनं लेकीचं नाव यारा असं ठेवलं. यारा तिच्या आई बाबांच्या चाहत्यांकडून अगदी भरभरून प्रेम मिळत राहते. यारा ६ महिन्यांची झाल्यानंतर अखेर मीनाक्षीनं पुन्हा काम करण्याचा निर्णय घेतला आहे.

मीनाक्षीनं सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत ही माहिती दिली आहे. मीनाक्षी नव्या मालिकेत नव्या भूमिकेत प्रेक्षकांना भेटायला येणार आहे. मीनाक्षीची नवी मालिका कोणती आहे तिनं अजून सांगितलं नसलं तरी तिच्या कमबॅकनं तिच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

मीनाक्षीने पोस्ट केलेल्या या व्हिडिओत तिच्या हातात एक स्क्रिप्ट दिसत असून मीनाक्षी एका मालिकेच्या सेटवर दिसत आहे. या व्हिडिओखाली मीनाक्षीने ‘लो फिर आगये हम, स्वागत नहीं करोगे.(कब कहाँ जल्द ही बतायेंगे)’ असं कॅप्शन लिहिलं आहे. अशाप्रकारे मुलीच्या जन्मानंतर मनोरंजन विश्वातून गायब असलेली मीनाक्षी पुन्हा एकदा शानदार कमबॅक करायला सज्ज आहे.

मीनाक्षी कोणत्या मालिकेत दिसणार आहे यावर तिनं कब कहाँ जल्द ही बतायेंगे, असं म्हटलं आहे. मीनाक्षीच्या कमबॅकवर सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील गौरी, जयदीपनं आनंद व्यक्त केलाय. दोघांनी मीनाक्षीचं अभिनंद केलं आहे. तर नवरा कैलास वाघमारेनं, ‘बाबौ! आंदेव’ म्हणत हार्ट इमोजी शेअर करत बायकोवरचं प्रेम व्यक्त केलंय.

Leave A Reply

Your email address will not be published.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप