बॉलिवूड मधील सर्वात फिट आणि हॉट अशी अभिनेत्री म्हणून दिशा पटानीने अनेकांना आपले वेडे केलं आहे. तिच्या सुंदर लूक आणि लेटेस्ट फोटोंमुळे ती नेहमीच चर्चेत येत असते. दिशा एक सर्वगुण संपन्न अशी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिचा डांस आणि तिच्या अदा चाहत्यांना घायाळ करण्यात कोणतीच कसूर सोडत नाही.
दिशाने आजवर अनेक चित्रपटातून आपले अभिनय कौशल्य सिद्ध केले आहे. आणि ती सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. आणि यावेळी तिने सोशल मीडियावर तिचे काही फोटोज फॅन्ससोबत शेअर केले आहेत जे काही क्षणातच व्हायरल झाले आहेत. यासोबतच तिने या फोटोज् ला दिलेले कॅप्शनने साऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
आपल्या सर्वांना माहीतच आहे की दिशा पटानी फिटनेस फ्रीक आहे आणि यासोबतच ती प्राणीप्रेमी देखील आहे. तिच्याकडे दोन पाळीव कुत्री आहेत, त्यापैकी एकाचे नाव बेला आणि दुसऱ्याचे नाव गोकू आहे. यासोबतच तिच्याकडे एक मांजरही आहे. यावेळी अभिनेत्री तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे, ज्यामुळे ती तिच्या पाळीव प्राण्यांना वेळ देऊ शकत नाही आणि त्यांना खूप मिस करत आहे.
View this post on Instagram
खास त्यांच्यासाठी दिशाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये ती तिच्या पाळीव कुत्री बेलासोबत खूप खुश दिसत आहे. सोबतच, शेयर केलेल्या व्हिडिओमध्ये दिशाने तिच्या बेलाला मिठीत घेतले आहे आणि ती त्याला किस देखील करते आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले आहे की, ‘मिसिंग माय बेलू’. याआधीही दिशाने आपल्या या लाडक्यावर आपले प्रेम व्यक्त करतानाचे फोटोज् आणि व्हिडिओज शेयर केले होते.
ज्यावर चाहत्यांनी ”, “Awann” असे कॉमेंट्स केले आहेत. आणि सोबतच लाइक्सचा वर्षाव देखील करत असतात. अभिनयासोबतच दिशा तिच्या बोल्ड लूकमुळे अनेकदा चर्चेत असते. ती अनेकदा तिचे बोल्ड फोटो फॅन्ससोबत शेअर करताना दिसते.दिशा पटानी पांढऱ्या बॅलेटमध्ये बीचवर तिची कर्वी फिगर फ्लॉन्ट करताना फोटो शेअर आहे. तिच्या या फोटोज् ना काही क्षणातच लाखो व्ह्युज मिळाले ज्यावर चाहत्यांनी अक्षरशः लाइक्स चा पाऊस पाडला होता.
दिशा पटानी येत्या काळात अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये आपली उपस्थिती दाखवणार आहे. ती ‘मलंग २’ आणि ‘वॉरियर’ सारख्या उत्कृष्ट चित्रपटांच्या माध्यमातून पुन्हा एकदा त्याच जोमाने मोठ्या पडद्यावर येते आहे. दरम्यान ती याआधी अभिनेत्री जॉन अब्राहम, तारा सुतारिया, अर्जुन कपूर यांच्यासोबत ‘एक व्हिलन रिटर्न्स’ या चित्रपटात स्क्रिन शेअर करताना दिसली आहे.