केवळ 55 धावांवर आऊट होण्यासाठी आफ्रिकन खेळाडूंनी पैसे दिले होते, केपटाऊन कसोटीत फिक्सिंगचे प्रकरण आले समोर. | African players

African players दक्षिण आफ्रिका आणि भारत (SA vs IND) यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना केपटाऊनच्या मैदानावर खेळला जात आहे. टीम इंडियाला पहिल्या सामन्यात एक डाव आणि ३२ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र दुसऱ्या सामन्यात पहिल्या दिवशी भारतीय संघाची गोलंदाजी उत्कृष्ट ठरली.

 

कारण, दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्रात संघ केवळ 55 धावांवरच मर्यादित राहिला. यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीला खूप ट्रोल केले जात आहे. त्याचबरोबर अवघ्या 23.2 षटकांत ऑलआऊट झाल्यानंतर आता या कसोटीवर फिक्सिंगचे सावट असल्याचे बोलले जात असून सोशल मीडियावरही याची जोरदार चर्चा होत आहे.

सामन्यावर फिक्सिंगची छाया!
दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यात खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात (SA vs IND) दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव अवघ्या 55 धावांवर आटोपला. यानंतर आता बीसीसीआय आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले जात असून या सामन्यात फिक्सिंग झाल्याचे मानले जात आहे. काही चाहते थेट बीसीसीआयला ट्रोल करताना दिसत आहेत.

मात्र, आम्ही याला अधिकृत दुजोरा देत नाही. पण पहिल्या डावानंतर सोशल मीडियावर फिक्सिंगची जोरदार चर्चा सुरू आहे. त्याचवेळी, वृत्त लिहिपर्यंत टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर पहिल्या डावात 50 धावांची आघाडी घेतली आहे आणि संघाच्या अद्याप 7 विकेट शिल्लक आहेत.

Leave a Comment

Close Visit uttamsheti