छोट्या पडद्यावर जास्त काळ कोणतेही पात्र वा भूमिका लोकप्रियता मिळवणे कठीण आहे आणि त्याहून कठीण आहे ती लोकप्रियता टिकवणे तितकेच अवघड . पण अशीच लोकप्रियता टिकवली तू म्हणजे महाराष्ट्राचे लाडके ‘भावोजी’ म्हणून ओळख मिळवणारे आदेश बांदेकर यांनी. ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमातून ते महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले.अभिनेता म्हणून सुरु झालेला आदेशचा प्रवास आज महाराष्ट्राचे लाडके भावोजी इथपर्यंत येऊन पोहोचला आहे.
आदेश बांदेकर होम मिनिस्टरच्या माध्यमातून इतरांच्या लव्हस्टोरी जाणून घेतात. पण सर्वांच्या लाडक्या भावोजींची लव्हस्टोरी नेमकी कशी आहे? हा प्रश्न अनेकांना पडतो.चला तर जाणून घ्या कशी आहे आपल्या लाडक्या भावोजींची भन्नाट प्रेमकहाणी..
अभिनेता आदेश बांदेकर यांनी अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांनी जोडी एव्हर्ग्रिन मानली जाते. या जोडीमधील प्रेम आणि मैत्री कायम चर्चेचा विषय ठरते.आदेश आणि सुचित्रा यांची लव्हस्टोरी एकदम फिल्मी स्टाइलची आहे.सुचित्रा ९वी मध्ये शिकत असल्यापासून आदेश यांचं त्यांच्यावर प्रेम होतं.असं त्यांनी सांगितलं. याच काळात ‘रथचक्र’ या मालिकेत सुचित्रा काम करत असताना आदेश यांनाही या मालिकेत काम करायची संधी मिळाली.
View this post on Instagram
त्यावेळी आदेश यांना पाहून सुचित्रा त्यांच्या प्रमात पडल्या.पण त्यांनी त्यांचं प्रेम कधी व्यक्त केलं नाही.एकीकडे मालिकेचं चित्रीकरण सुरु असताना आदेश अनेकदा सुचित्रा यांच्या शाळेच्या परिसरात जायचे.त्यामुळे माझा पाठलाग करु नकोस.मी काही तुला होकार देणार नाही, असं सुचित्रा यांनी बजावलं होतं.
एकदा शाळा सुटल्यावर आदेश यांनी सुचित्रा यांना भेटायला बोलावले होते. एका हॉटेलमध्ये ते दोघे भेटणार होते. सुचित्रा देखील आदेश बांदेकर यांना भेटायला निघाल्या होत्या. मात्र, त्यांनी आपला विचार बदलला आणी त्या मैत्रिणीसोबत दुसरीकडे फिरायला गेल्या. आदेश बांदेकर पूर्णवेळ वाट बघत त्याच हॉटेलमध्ये बसून होते. यानंतर त्यांनी सुचित्रा यांचे घर गाठले आणि थेट प्रपोज केले. यावेळी मात्र सुचित्राला होकार देणे टाळता आले नाही.
View this post on Instagram
दोघांनी एकमेकांना पसंत केले होते. मात्र, सुचित्रा यांच्या घरी प्रेमसबंध मान्य नव्हते. त्यावेळी आदेश बांदेकर यांचा इंडस्ट्रीत स्ट्रगल सुरू होते. त्यामुळे सुचित्रा यांनी आपल्या घरी आदेशविषयी काहीच सांगितले नाही. या दोघांनी पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. क्लासच्या निमित्ताने सुचित्रा घराबाहेर पडल्या आणि आदेश यांना बांद्रा कोर्टात भेटल्या. तिथे दोघांनी लग्न केले आणि नंतर घरी कळवले होते. या जोडीला एक सोहम नावाचा मुलगा असून, तो देखील मनोरंजन विश्वात सक्रिय आहे.