अभिनेत्री श्वेता शिंदेने केले दुसरे लग्न…नेटकऱ्यांच्या चर्चेला आले उधाण..
मराठी चित्रपट सृष्टी आणि मालिका विश्वामध्ये गेल्या काही वर्षात अनेक अभिनेत्रींचे दोन लग्न झाल्याच्या बातम्या देखील आपण अनेकदा पाहिलेल्या आहेत. या अभिनेत्री असे का करत असतील, असा प्रश्न देखील अनेकांना पडला आहे. मात्र, खाजगी जीवनात आलेल्या वादळामुळे त्यांना असे प्रकार करावे लागतात. सोशल मीडियावर अशा बातम्यांचा अगदी खच पडलेला असतो. आणि अशा कलाकारांच्या दुसऱ्या लग्नाच्या चर्चा नेटकऱ्यांमध्ये रंगल्या वाचून राहत नाहीत. अशीच चर्चा सध्या मराठी चित्रपसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आणि सध्या निर्माती म्हणून उदयास आलेली श्वेता शिंदे हिच्याबद्दल चालू आहे. तीही तिच्या दुसऱ्या लग्नाची…
श्वेता शिंदे हिने नुकतेच दुसर लग्न केल्याच्या बातम्या सोशल मीडियावर खूप वायरल झाल्या होत्या. पण कमालीची बाब म्हणजे तिने हे दुसरे लग्न तिच्याच नवऱ्यासोबत केले आहे. आणि तेही अगदीथाटात.. त्यामुळे या चर्चा अफवा आहेत असं म्हणणं बरोबर ठरेल.. चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार असं दुसऱ्यांदा लग्न केले आहे. काही महिन्यांपूर्वीच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने आपल्या पतीसोबत लंडनमध्ये दुसऱ्यांदा लग्न केले होते. त्याचप्रमाणे श्वेता नेही आपल्या पतीसोबत दुसऱ्यांदा विवाह रचला आहे.
View this post on Instagram
मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता शिंदे हिने अभिनयातच नाही तर निर्मिती क्षेत्रातील आपली छाप पाडली आहे. लागिर झालं जी या मालिकेची निर्मिती श्वेता शिंदेने केली होती. तिला मिळालेल्या भरघोस यशानंतर साता जन्माच्या गाठी, मिसेस मुख्यमंत्री, देव माणूस आणि देव माणूस २ या मालिकेची निर्मिती देखील तिने केली आहे.
सोबतच श्वेता डॉक्टर डॉन या मालिकेतही दिसली होती. श्वेताने मालिकाच नाहीतर सिनेमातही काम केले आहे. श्वेताचा नवरा हिंदी मध्ये प्रसिद्ध अभिनेता आहे. श्वेताने अभिनेता संदीप भन्साळी याच्याशी लग्न केल आहे. हे आपण अपराधी कौन या मालिकेदरम्यान दोघांची ओळख झाली. त्यानंतर दोघांची जवळीक वाढली.
या दोघांमध्ये खूप चांगली मैत्री झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. साल २००७ मध्ये पुण्यामध्ये पाहुणे आणि मंडळींच्या उपस्थितीत दोघांचं लग्न पार पडलं. संदीप याने हिंदी मालिका विश्वात आपली ओळख निर्माण केली आहे.ओ रहने वाली महलो की, ईश्वर साक्षी, क्रिश और कृष्णा, मोहिनी, प्यार के दो नाम, एक राधा एक शाम या गाजलेल्या मालिकेत त्याने महत्वपूर्ण भूमिका साकारली आहे.
मात्र संदीप आता अभिनय क्षेत्रात काम करत नसून पुण्यामध्ये तो कपड्यांचा बिझनेस करतो. तसेच सातारा शहरात त्यांचा व्यवसाय आहे. हरिओम साडी डेपो नावाने कपड्यांच्या भल्यामोठ्या शोरूमचा संदीप भन्साळी मालक आहे.