अभिनेत्री नेहा जोशीने केले अगदीच वेगळ्या पद्धतीने लग्न, महिला पुरोहितांनी पार पाडल्या विधी
पोश्टर बॉईज, झेंडा यांसारख्या मराठी सिनेमा आणि एण्ड टीव्हीवरील हिंदी मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडत नावारूपाला आलेल्या अभिनेत्री नेहा जोशी नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. ती नेहमीच तिच्या वेगळेपणामुळे उठून दिसते त्यामुळे तिचे हे लग्नही तसेच वेगळ्या पद्धतीने घडले. नेहाने प्रियकर ओमकार कुलकर्णीशी लग्न केलं. १६ ऑगस्ट २०२२ रोजी मुंबईत जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या उपस्थित हा विवाह संपन्न झाला. जस की आपण वाचतोय की तीचे वेगळेपण हेच तिच्याबद्दलचे आकर्षण आहे. तर नेहाला हे लग्न अगदी साधेपणानेच लग्न करायचं होतं आणि त्यानुसारच तिने ते केलही.
तिने आधी पारंपारिक विधींनंतर कोर्टात विवाह केला आणि दुस-या दिवशी स्वीट आणि सिंपल असे छोटेखानी रिसेप्शन ठेवण्यात आलं. तिच्या लग्नातील विशेष बाब म्हणजे तिच्या लग्नाची विधी चक्क दोन महिला पुरोहितांनी पार पाडली.त्यामुळे हा लग्नसोहळा अजूनच खास बनला. नेहाने लग्नात सोनेरी जर असलेली निळ्या रंगाची पैठणी साडी नेसली होती. तर रिसेप्शनसाठी एका डिझायनर मित्राने भेट दिलेली साडी तिने नेसली. दुसऱ्या दिवशी कोर्ट मॅरेजसाठी तिने सलवार कमीज निवडला.
लग्नाबद्दल नेहा जोशी म्हणाली, ”माझी मोठ्या जल्लोषात विवाह करण्याची कधीच इच्छा नव्हती आणि मी नेहमीच गोष्टी साध्यासोप्या ठेवण्याला पसंती दिली आहे. हा विवाह कमी जल्लोषात करण्यात आला, पारंपारिक विधींनंतर कोर्टात विवाह आणि दुसऱ्या दिवशी लहानसं रिसेप्शन ठेवण्यात आलं. माझ्यासाठी विवाह व समारंभ हे अधिककरून कौटुंबिक सोहळ्यासारखे आहेत आणि मी त्यांना खासगी ठेवणं पसंत करते. माझ्या विवाहाचा सर्वात चांगला भाग म्हणजे हा विवाह दोन महिला पुरोहितांनी केला, ज्यांनी आम्हाला विधींचा इतिहास आणि महत्त्व समजावून सांगितलं. ते खूपच सुंदर होते.”
View this post on Instagram
पती आणि अभिनेता, दिग्दर्शक, लेखक ओमकार कुलकर्णीबाबत सांगताना नेहा पुढे म्हणाली, “आम्ही सर्व गोष्टी धिम्या गतीने करण्याचं ठरवलं आणि लिव्ह-इन रिलेशनशीपमध्ये राहिलो. एकत्र हा प्रवास अद्भुत राहिला आहे आणि आता आमचा विवाह झाला असला तरी आम्हाला पेपरवर आमच्या नात्याला अधिकृत रूप देत असल्यासारखं वाटतं. आम्हाला विवाह करावा असं कधीच वाटलं नाही, कारण आमच्यामधील एकमेकांप्रती प्रेम, आदर व आपुलकी आमच्या नात्यापेक्षा अधिक होतं. याव्यतिरिक्त आम्ही पूर्णत: आमच्या करिअरवर लक्ष केंद्रित केलं, ज्यामुळे आम्ही व्यस्त राहिलो.” त्यांचे हे आगळेवेगळे लग्न नक्कीच तरुण पिढीला नवी पद्धत अनुसरण करण्यास भाग पाडेल.