केतकी माटेगावकर हिच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर, सोशल मीडियावर बातमी झाली व्हायरल..

0

चित्रपसृष्टीतील अनेक कलाकारांच्या खाजगी आयुष्याशी निगडित बाबी जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. त्यांच्या प्रत्येक आनंदात ते आनंदी असतात तर त्यांच्या दुःखात दुःखीदेखील होतात. सध्या दुःखाची सावली केतकी माटेगावकर हिच्या कुटुंबियांवर पसरली आहे.

एक धक्कादायक आणि दुःखद बातमी समोर आली असून सोशल मीडियावर देखील अनेकजण श्रद्धांजली वाहत आहेत. तिच्या कुटुंबातील सर्व सदस्य फार दुःखी झाले आहेत.

अभिनेत्री केतकी हिचा हा चुलत भाऊ अक्षय माटेगावकर याने पुण्यात राहत्या घरात आत्महत्या केली आहे. नोकरी मिळत नसल्याने त्याने आत्महत्या केली आहे, असे त्याने लिहिले आहे की,

अक्षय त्याच्या आईवडिलांसोबत पुण्यात राहत होता. आठव्या मजल्यावरील घरातील बाल्कनीतून उडी मारून त्याने आपलं आयुष्य संपवलं. अक्षयने त्याच्या पालकांसाठी एक सुसाईड नोट लिहिली होती. ज्यामध्ये त्याने स्वतः लिहिले आहे की, तो त्याच्या इंटर्नशिप प्रोग्राममध्ये चांगली कामगिरी करू शकला नाही आणि एका नामांकित कंपनीमध्ये प्लेसमेंट न मिळण्याच्या भीतीमुळे त्याने आत्महत्येचा निर्णय घेतला आहे.

आत्महत्येपूर्वीच्या या चिठ्ठीत पुढे त्याने असंही लिहिलं की त्याने इंटर्नशिप प्रोग्राममध्ये यशस्वी ठरण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले होत. परंतु तो त्याच्या कुटुंबीयांच्या अपेक्षा पूर्ण करू शकला नाही. अक्षयने लिहिलं की, या घटनेनंतर त्याला त्याच्या पालकांना सामोरं जाण्याची भीती वाटत होती आणि आत्महत्या हाच एकमेव पर्याय त्याच्यासमोर शिल्लक होता. केतकी माटेगावकर सध्या तिच्या आगामी प्रोजेक्टसाठी लॉस एंजिलिसमध्ये असून तिने अद्याप या घटनेबद्दल तिची प्रतिक्रिया दिली नाही.

अक्षय माटेगावकर असे त्याचे नाव होते, वयाच्या २१ व्या वर्षी त्याने चक्क आठव्या मजल्यावरून उडी मारली आहे. अक्षय हा कम्प्युटर सायन्स विभागात चौथ्या वर्षात शिकत होता. माउंट युनिक सोसायटीच्या आठव्या मजल्यावर तो राहत होता. अक्षयची आई मीनल माटेगावकर या मुंबईत प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत, वडील अमोल माटेगावकर हे नामांकित कंपनीत मेकॅनिकल इंजिनिअर पदावर कार्यरत आहेत.

अक्षय आपल्या करिअर बाबतीत खूप सिरीयस होता, त्याच्या नोकरीच्या बाबतीत तो गंभीर होता. नुकतेच त्याने एका आयटी कंपनीत काम केले होते. त्यानंतर काही कंपनीत त्याने अर्ज देखील केले होते मात्र नोकरी मिळवण्यात त्याला यश मिळाले नाही.आता नोकरी मिळणार नाही असं त्याच्या मनावर ठसले, आणि त्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.

नैराश्य माणसाला अशा गोष्टी करण्यास भाग पाडत असत. त्यामुळे तुम्हीही कोणत्या नैराश्याला सामोरे जात असाल तर आपल्या प्रियजनांशी बोला, आणि आपली काळजी घ्या..

Leave A Reply

Your email address will not be published.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप