झी मराठी वाहिनीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेने जणू अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावले होते. या मालिकेतील राणा दा आणि अंजली या पात्रांनी चाहत्यांच्या मनाचा ठाव घेतलाच पण या मालिकेतील आणखी एका पात्राने चाहत्यांची मने जिंकली ती भूमिका म्हणजे नंदिनी वहिनी साहेब.. ही भूमिका साकारून अभिनेत्री म्हणजे धनश्री काडगावकर तुफान लोकप्रियता मिळवली.
या मालिकेतील वहिनी साहेबांचा गावरान ठसका आणि रोकठोक स्वभाव यांची सांगड घालून धनश्री ने चाहत्यांच्या मनात पक्के स्थान निर्माण केले. त्यामुळेच मालिका संपूर्ण बरेच दिवस झाले असले तरी वहिनी साहेबांना लोक विसरू शकलेले नाही. धनश्रीनं तिच्या तगड्या अभिनयानं वहिनीसाहेब ही भूमिका एका उंचीवर नेऊन ठेवली. प्रेग्नंसीमुळे धनश्रीला अर्ध्यावर मालिका सोडावी लागली. पण आई झाल्यावर मात्र धनश्रीनं झी मराठीवरील मालिकेत जोरदार कमबॅक केलं आहे. तू चाल पुढं मालिकेत धनश्री शिल्पीची भूमिका साकारत आहे.
आताही ती चर्चेत आली आहे. ती म्हणजे झी मराठीवर येऊ घातलेल्या मालिकेमुळे. झी मराठी वाहिनीवर दार उघड बये ही नवी मालिका 19 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. रुढी परंपरांच्या सीमा पार करून संबळ वाजवणाऱ्या मुलीच्या आयुष्याची गोष्ट मालिकेतून दाखवण्यात येणार आहे. यानिमित्तानं कलाकारांच्या आयुष्यातील दार उघड मुमेंट शेअर करण्यात आल्यात. त्यावेळी बोलताना धनश्रीनं तिच्या पहिल्या कार्यक्रमाच्या आठवणी शेअर करत तिची पहिली दार उघड आठवण शेअर केली आहे.
View this post on Instagram
“12 वर्षांपूर्वी महाराष्ट्राचा सुपरस्टार शो सुरू झाला होता. जो शो एक अँक्टिंग हंट शो होता. संपूर्ण महाराष्ट्रातून या स्पर्धेत मुलं मुली आली होती. त्यातून माझं सिलेक्शन झालं. मी टॉप 5 मध्ये आले. ती स्पर्धा झाल्यानंतर मला स्वत:हून अनेक कामांच्या ऑफर्स येऊ लागल्या. मी कामं करत गेले. तेव्हा मला जाणवलं की हे क्षेत्र आपल्याला आवडतंय. या क्षेत्रातच आपल्याला काही तरी करायचं आहे. हा क्षण माझ्या आयुष्यातील दार उघड प्रसंग होता.’
धनश्रीनं साल २०१२ मध्ये महाराष्ट्राच्या सुपरस्टार कार्यक्रमात सहभागी झाली होती. त्यानंतर २०१३ मध्ये ‘गंध फुलांचा गेला सांगून’ या मालिकेतून तिला मोठा ब्रेक मिळाला. या मालिकेत ती नायिकेच्या भूमिकेत होती. त्यानंतर तिनं ‘चिठ्ठी’ या सिनेमात काम केलं. २०१६ मध्ये धनश्रीला ‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका मिळाली. या मालिकेनं तिला खरी लोकप्रियता मिळवून दिली. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत वहिनीसाहेबांची भूमिका साकारण्याआधी धनश्रीनं गंध फुलांचा गेला सांगून या मालिकेत काम केलं होतं.