अभिनेता सिद्धार्थ जाधव होता आठवडाभर हॉस्पिटलमध्ये भरती.. पोस्ट शेयर करून दिली माहिती..

0

मराठी चित्रपसृष्टीतील कॉमेडी किंग आणि आपल्या हटके अंदाजाने सर्वांना हसवणारा अभिनेता म्हणून ओळखला जाणारा सिद्धार्थ जाधव अलीकडे नेहमीच चर्चेत येत असतो. तो सोशल मीडियावरदेखील प्रचंड सक्रीय असतो. तो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून त्याच्या आयुष्यातील छोटे मोठे क्षण शेअर करत असतो. त्याच्या मजेशीर पोस्ट नेहमीच सर्वांच लक्ष वेधून घेण्यात अव्वल ठरतात.

मात्र नुकतीच सिद्धार्थनं एक पोस्ट शेअर केली जी पाहून त्याच्या चाहते काळजीत पडले आहेत. कारण सिद्धार्थ गेला एक आठवडा आजारी असून हॉस्टिपटलमध्ये दाखल झाला होता. नुकताच त्याला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे. सिद्धार्थनं स्वत: आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट लिहित ही माहिती त्याच्या चाहत्यांना दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Siddharth jadhav (@siddharth23oct)

सिद्धार्थनं सोशल मीडियावर हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत पोस्ट लिहिली आहे. ज्यामध्ये दिसत आहे की, त्याच्या हातात हॉस्पिटलमधील स्टिकर आहे. अभिनेता सिद्धार्थ जाधवचे तमाशा लाईव्ह आणि दे धक्का हे दोन सिनेमे बॅक टू बॅक प्रेक्षकांच्या भेटीला आले. दोन्ही सिनेमांचं सिद्धार्थनं दणदणीत प्रमोशन केलं. प्रमोशनसाठी सिद्धार्थ सतत धावपळ करत होतो. या सगळ्यात त्याच्या आरोग्याकडे त्याचं दुर्लक्ष झालं. त्यामुळे त्याची प्रकृती बिघडली आणि त्याला उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल व्हाव लागलं. सिद्धार्थला नेमकं काय झालं होतं हे त्यानं अद्याप सांगितलेलं नाही. सिद्धार्थवर मुंबईच्या हिंदूजा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. आता त्याची प्रकृती आता बरी असून तो घरी परतला आहे.

सिद्धार्थला स्वतंत्रादिनाच्या मुहूर्तावर हॉस्पिटलमधून स्वातंत्र्य मिळालं आणि तो घरी परतला आहे. त्यानं पोस्ट लिहित हॉस्पिटलमध्ये त्याची काळजी घेणाऱ्या सर्व डॉक्टर आणि त्याच्या नातेवाईकांचे आभार मानले आहेत. सिद्धार्थनं म्हटलंय, ‘गेला आठवडाभर मी हिंदूजा हॉस्पिटलमध्ये अँडमिट होतो. आज घरी आलो. मनापासून आभार हिंदूजाच्या हॉस्पिटलच्या स्टाफचं. खुप मनापासून काळजी घेतली माझी. मी बरा व्हा व्हा म्हणून ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्यांना मनापासून धन्यवाद’.

पोस्टच्या शेवटी सिद्धार्थनं सर्वांना आपल्या तब्येतीकडे लक्ष देण्याचं आवाहन देखील केलं आहे. त्यानं म्हटलंय, ‘आता हळूहळू बरा होतोय. खुप धावपळ असते आपली. पण त्यातही स्वतःच्या हेल्थकडे दुर्लक्ष होणार नाही याची प्लिज काळजी घ्या’.

सिद्धार्थच्या पोस्टनंतर त्याच्या चाहत्यांनी आणि सगळ्या मित्र मैत्रिणींनी त्याला काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. सोबतच तो बरा व्हावा म्हणून भरपूर प्रेम देखील व्यक्त केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप