वयाच्या ७२व्या वर्षी तरुणांनाही लाजवेल अशी बॉडी, मात्र ज्येष्ठ अभिनेते शरत सक्सेना यांना आहे ‘या’ गोष्टीची भीती..
महाभारताच्या लोकप्रिय टेलिव्हिजन रूपांतरामध्ये त्यांनी किचकाची भूमिका साकारणाऱ्या शरद सक्सेना यांनी नुकतीच आपल्या वयाची ७१ वर्षे पूर्ण करून ७२ व्या वर्षात पाऊल टाकले.पण त्यांची पिळदार शरीरयष्टी पाहून त्यांच्या वयाचा अंदाज बांधणे महाकठीण होऊन बसते. त्यांनी त्यांच्या आजवरच्या कारकीर्दीत मिस्टर इंडिया, त्रिदेव, घायाळ, खिलाडी, गुलाम, गुप्त: द हिडन ट्रुथ, सोल्जर, बागबान, फना, क्रिश आणि एक ही रास्ता यासारख्या काही हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याने काही तमिळ, मल्याळम आणि तेलगू चित्रपटही केले आहेत.
गुलाम चित्रपटातील त्यांच्या अभिनयाने त्याला फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट खलनायक पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. यासोबतच शरत सक्सेना यांनी बॉडीगार्ड, बजरंगी भाईजान, क्रिश, मिस्टर इंडिया, अग्निपथ,त्रिदेव, गुलाम या चित्रपटांमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारली आहे.
ते अलीकडेच विद्या बालन स्टारर शेरनीमध्ये दिसला होता जो १८ जून रोजी अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झाला होता. असे मानले जाते की, अभिनेत्रींचे शेल्फ लाइफ इंडस्ट्रीतील त्यांच्या पुरुष समकक्षांपेक्षा खूपच कमी असते.
View this post on Instagram
दरम्यान, त्यांनी द इंडियन एक्स्प्रेसला सांगितले, “जहां आप बूढ़े लगने लगे, आपको फिल्म इंडस्ट्रीसे बाहर फेक दिये जाओगे. ते पुढे म्हणाले, “मी पार्टी करत नाही पण मी रोज व्यायाम करतो. मी ७१ वर्षांचा आहे पण मला ४५ वर्षांचे दिसायला हवे. हे असे आहे. ज्या क्षणी तुम्ही म्हातारे दिसू लागाल, तेव्हा तुम्ही चित्रपटसृष्टीतून बाहेर फेकले जाल. हा तरुणांचा उद्योग आहे. प्रत्येकाने तरुण असणे आवश्यक आहे. तुम्ही म्हातारे आहात की नाही, काही फरक पडत नाही. आपण तरुण दिसले पाहिजे. इथे म्हातारा असणे हा गुन्हा आहे.”
एकदा त्यांनी मुलाखतीत सांगितले होते की, मी जेव्हा चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली तेव्हा माझी शरीरयष्टी पिळदार होती.परंतु हि गोष्ट ७०-८० च्या दशकात एक गुन्हा होती. कारण बॉडीबिल्डर लोक अशिक्षित, भावनाहीन, आणि अभिनयाचं ज्ञान असलेले मानले जात असे. परंतु आता आजच्या काळात सर्वकाही बदलले आहे.
ज्येष्ठ अभिनेते शरत सक्सेना ज्यात यांनी ३० वर्षे बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये टायकास्ट केले. ते त्याच्या फिटनेसमुळे ऑनलाइन पुन्हा समोर आले. २०१८ मध्ये CINTAA (सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन) ला दिलेल्या भावनिक मुलाखतीत शरत म्हणाले होते की, कोणत्याही दिग्दर्शकाने कधीही त्याला अभिनेता म्हणून मानले नाही. त्यामुळे त्यांच्या शरीरयष्टीमुळे ते ज्युनियर कलाकारांच्या भूमिकेत दिसून आले. त्यांना दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा..!