गुपचूप साखरपुडा उरकला.. पण सोशल मीडियाने खुलासा केला.. संत बाळूमामा मालिकेतील अभिनेत्याने शेयर केली पोस्ट..
सध्या टिव्ही इंडस्ट्रीमध्ये लग्नसराईची धूम पहायला मिळत आहे. सध्या हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांचा लग्नसोहळा दिमाखात पार पडत आहे. या वर्षी अक्षय तृतीयेला त्यांनी गुपचूप साखरपुडा करून सर्वांना आश्चर्याचा धक्काच दिला होता. तर दुसरीकडे अशीच सोशल मीडियावर आणखी एका लोकप्रिय अभिनेत्याने गुपचूप साखरपुडा उरकल्या ची बातमी तुफान व्हायरल होत आहे. ही बातमी आहे कलर्स मराठी वरील ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारा अभिनेता सुमीत पुसावळे याची.
होय, संत बाळूमामा यांची भूमिका सकारत प्रेक्षकांकडून कौतुकाची थाप मिळवणारा अभिनेता सुमीत पुसावळे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. नुकताच सुमीतचा साखरपुडा पार पडला. त्याने त्याच्या साखरपुड्याचे काही फोटो सोशल मीडियावरून चाहत्यांशी शेअर करत त्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे.सुमितने साखरपुड्याच्या दिवशीचा फोटो शेअर करताच चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत त्याचे अभिनंदन केले आहे.
सुमित लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. पण त्याआधी त्याचा साखरपुडा पार पडला. भावी पत्नीसोबतचा एक सुंदर फोटो त्याने शेअर केला. १६ नोव्हेंबर रोजी त्याने एक पोस्ट शेअर करत त्याच्या नात्याची कबुली दिली होती. तेव्हा होणाऱ्या बायकोचा हात हातात घेतलेला एक फोटो शेअर करत त्याने म्हटलं होतं, “जेव्हा तुम्ही पळून जायला खूप उशीर करता…” त्यानंतर काल त्याने त्याच्या होणाऱ्या पत्नीसोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. यात ते दोघेही दाक्षिणात्य वेषभूषेमध्ये दिसत आहेत. सुमीतच्या होणाऱ्या बायकोचं नाव मोनिका आहे.
View this post on Instagram
‘उनका हाथ पकडना तो बस एक बहाना था, मकसद तो लकीरोंसे लकीर जोडना था…,’ असं कॅप्शन त्याने या फोटोला दिलं आहे. या फोटोत सुमित व त्याची होणारी बायको दोघंही दाक्षिणात्य वेषभूषेत दिसत आहेत.
View this post on Instagram
वेडिंग फोटोशूटचा एक फोटोही त्याने शेअर केला आहे. सुमित गुडघ्यावर बसून आपल्या होणाºया बायकोला प्रपोज करतोय, असा हा फोटो आहे. सुमितच्या होणाऱ्या बायकोचं नाव मोनिका आहे.त्याने लागीरं झालं जी, स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेतून तो लाइमलाइटमध्ये आला. साल २०१८ मध्ये त्याने ‘लागीरं झालं जी’या मालिकेत खलनायकी भूमिका साकारली होती. या मालिकेनंतर त्याने पुन्हा कधी मागे वळून पाहिलं नाही. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या लोकप्रिय मालिकेत त्याने साकारलेली महाडिक राजे यांची भूमिकाही गाजली होती. सुमितने बॉलिवूडची देसी गर्ल अर्थात अभिनेत्री प्रियंका चोप्रासोबतही काम केलंय. प्रियंका चोप्राच्या एका चित्रपटासाठी त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलंय.