अभिनेता मनोज वाजपेयीनी लावली कोल्हापुरात हजेरी..आई अंबाबाईच्या चरणी मंदिरात केलं ध्यान..

बॉलीवुड मध्ये असे काही मोजके कलाकार आहेत ज्यांनी आपल्या दमदार अभिनयाने मु सिनेसृष्टीवर आपली वेगळी अशी छाप सोडली आहे. विविध धाटणीच्या भूमिका साकारत त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत अभिनेते मनोज वाजपेयी यांनी बॉलिूडमध्ये आपले स्थान पक्के केले आहे. मनोज बाजपेयी साध्या चर्चेत आले आहेत. आणि त्यांचे चर्चेत येण्याचं कारण काही खासच आहे. काय आहे हे खास कारण जाणून घ्या..

सुप्रसिद्ध अभिनेते मनोज बाजपेयी यांनी शुक्रवारी कोल्हापुरात सांयकाळी वृक्षप्रसाद योजनेच्या लोकार्पण सोहळ्याला हजेरी लावली. यावेळी त्यांच्यासोबत अभिनेते सयाजी शिंदेही उपस्थित होते. कोल्हापूर आणि सह्याद्री देवराई यांच्या संयुक्त विद्यमानाने श्री महालक्ष्मी मंदिरात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी सुप्रसिद्ध अभिनेते मनोज वाजपेयी यांनी अंबाबाई मंदिरात ध्यान केलं असल्याची बातमी समोर आली आहे.

देवी अंबाबाईचा प्रसाद म्हणून मिळालेला वृक्ष तुमच्या अनेक पिढ्यांना लाभदायक ठरेल, असे मत मनोज वाजपेयी यांनी व्यक्त केले.सह्याद्री वनराई संस्था, देवस्थान समितीतर्फे अंबाबाई मंदिरात अभिषेक करण्यासाठी येणाऱ्या भाविकांना वृक्ष प्रसाद वाटप योजनेच्या आरंभप्रसंगी ते बोलत होते.सह्याद्री देवराई सामाजिक संस्था, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती आणि सामाजिक वनीकरण विभागातर्फे हा कार्यक्रम घेण्यात आला.अंबाबाई मंदिरात भाविकांना म्हाळुंग, पारिजातक, बेल जास्वंदी, अर्जुन आदी जातीची फळफुलांची रोपे देण्यात येणार आहेत.

वृक्ष प्रसाद’ ही मोहीम नव्हे, हा एक विचार आहे आणि हा विचार कोल्हापुरातूनच सुरू झाला. ज्यांची देव आणि आई-वडिलांवर श्रद्धा आहे, त्यांनी हा प्रसाद न्यायचा आहे. झाड कधी तुम्हाला फसवत नसल्याचे सयाजी शिंदे म्हणाले.यापुढे राज्यभर ही योजना राबवण्यात येणार आहे.भाविकांना मिळालेले झाड त्यांनी कुठे लावले आणि त्याचे संगोपन केले, याचे सेल्फी पाठवण्याचेही आवाहन संस्थेने केले आहे.मनोज वाजपेयी यांनी अंबाबाई मंदिरात ध्यानही केलं.

९० च्या दशकातील या कल्ट क्लासिक चित्रपटाने आपल्याला अनेक उत्तम पात्रे आणि गाणी दिली. या भूमिकेसाठी त्यांना प्रथमच सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. त्यांनी मागेच एक पोस्ट शेअर करत भिकू म्हात्रे पुन्हा येणार असल्याचं सांगतिलं होतं. त्यामुळे त्यांचे चाहते त्यांनी पुन्हा त्या भूमिकेत पाहण्यासाठी खूप उत्साही आहेत.

मनोज वाजपेयी यांनी अनेक उठावदार भूमिका साकारून  आज या  चित्रपट, वेबसीरीज अशा विविध माध्यमातून आपल्या अभिनयाचा कस दाखवला आहे.

 

Leave a Comment

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप