अपूर्वा नेमळेकर आली चर्चेत.. झाला होता या राजकीय व्यक्तीशी प्रेमविवाह..
टिव्ही इंडस्ट्री मध्ये सर्वात लोकप्रिय आणि वादग्रस्त घो म्हणजे बिग बॉस. अनेक चर्चांना सामोरे जात आज पुन्हा एकदा या शोने प्रेक्षकांना वेड लावायला सुरुवात केली आहे. या शोची चर्चा दररोज नेट करी करत असतात. त्यामुळे सध्या या शोचा टीआरपी देखील चांगला असल्याचे पाहायला मिळते आहे. दरम्यान, या शोमध्ये अनेक लोकप्रिय कलाकार दाखल झाले यापैकी एक म्हणजे अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर.. बिग बॉसमुळे ती पुन्हा एकदा प्रसिद्धीझोतात आली आहे. आणि आता सोशल मीडियावर तिच्या पर्सनल लाईफबद्दल नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगत आहेत.
अपूर्वा नेमळेकरने झी मराठीवरील ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेत शेवंताची आकर्षक भूमिका साकारली होती.. तिच्या या भूमिकेने सर्वांना अगदी वेड लावले होते आणि यामुळेच ती महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली आहे. अपूर्वा नेमळेकर बिग बॉसमध्ये अनेकदा तिच्या सिंगल असण्याबद्दल बोलली आहे. अनेकदा ती कार्यक्रमातही याबद्दल खुलासा करत असते. पण तुम्हाला माहितीये का? अपूर्वा नेमळेकरचा प्रेमविवाह झाला होता. काही महिन्यांनी मात्र त्यांचा घटस्फोट झाला होता.
View this post on Instagram
अपूर्वा नेमळेकरच्या पूर्वाश्रमीच्या पतीचे नाव रोहन देशपांडे असे होते. त्यांचा विवाह २०१४ मध्ये पार पडला होता. ते दोघेही एकमेकांचे चांगले मित्र होते. अपूर्वा नेमळेकर आणि रोहन देशपांडे हे ८ वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. ८ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर ते लग्नबंधनात अडकले होते. त्या दोघांचा पारंपरिक पद्धतीने लग्नसोहळा पार पडला होता.
अपूर्वाचा पूर्वाश्रमीचा पती रोहन देशपांडे हे राजकीय क्षेत्रात सक्रीय आहेत.रोहन देशपांडे हे शिवसेनेचा पदाधिकारी आहे.रोहन हे दादर परिसरात वास्तव्यास आहे.ते अनेक सामाजिक कार्यात सहभागी असतो.रोहन हे सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांना ओळखतो.त्याने सिनेसृष्टीतील बहुतांश कलाकारांबरोबर फोटो शेअर केले आहेत.
मुंबईत ते दोघेही लग्नबंधनात अडकले होते. पण त्यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. लग्नानंतर काही वर्षांनी त्यांच्यात खटके उडण्यास सुरुवात झाली. त्यामुळे त्यांचा घटस्फोट झाला. तिच्या रिलेशनशिपबद्दल अनेकदा चर्चा सुरु असते. पण तिने त्याकडे कधीही लक्ष दिलं नाही.
तिच्या खासगी आयुष्यातील वादानंतर आता ती तिने तिच्या करिअरवर लक्ष केंद्रीत केले आहे. अपूर्वा नेमळेकरची ‘आभास हा’ ही पहिली मालिका होते. त्याबरोबर ‘ती एका पेक्षा एक जोडीचा मामला’ यामध्येही झळकली होती. तिची ‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका चांगलीच गाजली. या मालिकेच्या दोन्हीही भागात तिने काम केले. तिने ‘आराधना’ या मालिकेतही काम केले होते. त्याबरोबर ‘तू माझा सांगती’ या मालिकेतही तिने उत्तम काम केले आहे