‘द कपिल शर्मा शो’ ला कृष्णा अभिषेकने केला अखेरचा राम राम! समोर आलं ‘हे’ मोठं कारण

द कपिल शर्मा शो हा कार्यक्रम पुन्हा एकदा नव्या रूपात नव्या स्कीटसह रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. पण या नव्या शो च्या सीजन मध्ये सपना हे पात्र आपल्याला दिसणार नाही. कारण कृष्णा अभिषेक आता या कार्यक्रमाचा भाग राहिलेला नाही. स्वतः कृष्णाने या बातमीला दुजोरा दिला असून या मागचं कारणही त्याने मीडिया सोबत शेयर केलं आहे.

 

द कपिल शर्मा शो मध्ये कधी धर्मेंद्र बनून तर कधी जॅकी श्रॉफ बनून तर कधी सपना बनून खळखळून हसवणाऱ्या कृष्णाला त्याचे फॅन्स नक्कीच मिस करणार आहेत! त्यामुळेच आता या शोच्या नव्या सीझनमध्ये कृष्णा अभिषेक नाहीये म्हटल्यावर त्याचे फॅन्स निराश झाले आहेत.

द कपिल शर्मा हा कार्यक्रम कृष्णाने सोडला हे वृत्त ऐकून इंडस्ट्रीमध्ये अनेक उलट सुलट चर्चांना सुरुवात झाली होती. यामध्ये कृष्णाचे आणि कपिल शर्माचे मतभेद झाल्यामुळे त्याने हा शो सोडला अशी चर्चा होती. तसेच कृष्णाला या कार्यक्रमातून कमी मानधन मिळत असल्याच्या कारणामुळे ही चर्चा सुरू झाल्या होत्या परंतु आता स्वतः कृष्णाने या बाबतचे मौन सोडत कार्यक्रम सोडण्याचे खरं कारण स्पष्ट केल आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Krushna Abhishek (@krushna30)

मीडियाच्या पिंकविला या न्यूज पोर्टल सोबत गप्पा मारताना त्याने या मागचं खरं कारण स्पष्ट केलं. यावेळी कृष्णा म्हणाला की,

“या शोमध्ये मी नाही ही गोष्ट खरी आहे. काही एग्रीमेंट इश्यूज होते, तसेच निर्मात्यांसोबत कॉन्ट्रॅक्ट संबंधित काही समस्या आल्याने हा शो सोडावा लागतोय. जेवढे प्रेक्षक मला मिस करणार आहेत तेवढेच मी देखील त्यांना मिस करणार आहे. त्यांच्या प्रेमामुळेच मी आज या ठिकाणी पोहोचलो आहे” असेही तो यावेळी म्हणाला.

यादरम्यान कार्यक्रमाच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार कपिल शर्मा व कृष्णा यांच्यात वाद असल्याची चर्चा निव्वळ अफवा आहे, दोघात कसलेही वाद नाहीत. मात्र मानधनाच्या मुद्द्यावरून निर्माता आणि कृष्णा यांचा थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे आणि म्हणूनच याच मुद्द्यावरून कृष्णा अभिषेकला द कपिल शर्मा शो या कार्यक्रमातून बाहेर पडाव लागल आहे. या गोष्टीचा कपिल शर्मा शी कसलाच संबंध नाहीये. या सर्व पार्श्वभूमीवर कार्यक्रमाचे निर्माते कृष्णा अभिषेकला परत आणण्यासाठी प्रयत्न करणार का? आणि कृष्णाच्या चाहत्यांना तो पुन्हा एकदा या शो मधून झळकताना दिसणार का? या प्रश्नांबाबत प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.

Leave a Comment

Close Visit Np online