अभिजित आणि सुखदा खांडकेकरची भन्नाट लव्हस्टोरी…मेसेजवरून जमली जोडी…जाणून तुम्हीही..

मित्रहो प्रेम प्रेमानेच जपता येते, जोवर आपण प्रेमात पडत नाही तोवर त्यातील गमती जमती समजत नाही.  प्रेमात प्रत्येक वेळी नव्याने बहर येत असतो, खूप काही सांगावस वाटत आणि खांद्यावर डोके अलगद टेकून ऐकावस वाटत. हलक्या फुलक्या विनोदात देखील आपण खळखळून हसतो, आणि वेडावलेले भास कवितेत मांडतो. अनेकांची अशी लव्हस्टोरी पाहायला मिळते, ऐकायला मिळते आणि ही लव्हस्टोरी ऐकताना आपल्या गालावर कधी हसू उमटते कळत देखील नाही. तर मित्रहो आज आपण अशीच एक खास प्रेमकथा जाणून घेणार आहोत.

 

एका मेसेज पासून सुरू झालेला संवाद प्रेमाची पहिली पायरी कधी गाठतो ते समजत नाही, अशीच लव्हस्टोरी सुरू झाली अभिनेता अभिजित खांडकेकर आणि अभिनेत्री सुखदा खांडकेकर यांची. दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करतात, अनेक चाहते त्यांच्या जोडीला खूप पसंत करतात. नाशिक मधून मुंबईत येऊन आभिनेता अभिजितने अभिनय क्षेत्रात आपले नशीब अजमवण्याचा प्रयत्न केला, याबाबतीत बराच काळ त्याने स्ट्रगल केला. चित्रपटात काम करण्यापूर्वी तो बराच काळ रेडिओ जॉकी म्हणून कार्यरत होता. त्यातच निरनिराळ्या मालिका आणि सिनेमांसाठी ऑडिशन देण्याचे काम सुद्धा सुरू होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Abhijeet Khandkekar (@abhijeetkhandkekar)

दरम्यान अभिजितने महाराष्ट्राचा सुपरस्टार या झी मराठी वरील रियालिटी शोमध्ये त्याने सहभाग घेतला होता. त्यावेळी अभिनयातील त्याचे टॅलेंट सर्वानाच थक्क करून गेले, नंतर त्याची “माझिया प्रियाला प्रीत कळेना” या मालिकेसाठी निवड झाली. या मालिकेतील त्याची भूमिका अनेकांना थक्क करून गेली होती, ही मालिका व सोबतच अभिजित सुद्धा खूप प्रसिद्ध आणि लोकप्रिय झाला होता. नाशिकची सुखदा सुद्धा त्याच्या अभिनयाची दिवाणी झाली व सोशल मीडियावर मेसेज करून तिने त्याच्या कामाचे कौतुक केले. “माझ्या घरातील सर्वजण तुझी मालिका व अभिनय पाहतात, नाशिकचा मुलगा उत्तम काम करतो”

 

View this post on Instagram

 

A post shared by Abhijeet Khandkekar (@abhijeetkhandkekar)

असे तिने म्हणले, हळूहळू संवाद वाढत गेला. नाशिकचेच दोघेही असल्याने मित्रमंडळी सुद्धा खूप होते. ओळख म्हणता म्हणता त्याचे रूपांतर मैत्रीत झाले. मैत्रीत भेटी गाठी वाढायला लागल्या, सुखदा सोबत वेळ घालवणे अभिजितला आवडायला लागले. अशातच वाढत्या भेटीत एके दिवशी अभिजितने सुखदाला प्रपोज केले. सुखदाला हे कधीच अपेक्षित न्हवते, तिने त्याला अनेकदा विचार करण्यास सांगितले. मात्र अभिजित त्याच्या निर्णयावर ठाम होता. सुखदा त्याला चांगले ओळखत होती, त्याचा स्वभाव जाणून होती.

तिने लगेचच होकार दिला व महिन्याभरात दोघांच्याही घरच्यांनी एकमेकांची भेट घेतली व दोघांचा साखरपुडा करून टाकला. नंतर १ फेब्रुवारी २०१३ला ही जोडी लग्नबंधनात अडकली. आजदेखील दोघेजण एकत्र असताना खूप गोड दिसतात. त्यांचे प्रेम असेच वाढत राहो ही सदिच्छा. त्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी भरपूर शुभेच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.

Leave a Comment

Close Visit uttamsheti