‘देवयानी’ फेम आबासाहेबांची लेक मिळवतेय या क्षेत्रात नाव.. करतेय बॉडी बिल्डिंग, पहा फोटो

0

चित्रपसृष्टीमध्ये अनेक कलाकारांनी आजवर त्यांच्या अभिनयाच्या जोरावर अभिनय क्षेत्रात आपले मोठे नाव कमावले आहे. यात सर्वात आघाडीचे कलाकार आणि त्यांची मुले अभिनय क्षेत्रात सक्रिय राहून ओळख बनवली. पण अनेक कलाकारांची अशी काही मुले आहेत ज्यांनी अभिनय सोडून वेगळाच मार्ग निवडत आपले करियर घडवले आहे. आणि अशा स्टार किड्स मध्ये बॉलीवूड अभिनेता आर माधवन च्या मुलाचे नाव नेहमी चर्चेत येत असते. पण आता अजून एका स्टार कीड चे नाव समोर येत आहे ते म्हणजे कुहू भोसले..

छोट्या आणि मोठ्या पडद्यावर आपल्या अभिनयाने आपली वेगळी छाप सोडत अभिनेता नागेश भोसलेने आपले नाव बनवले आहे. सोबतच देवयानी’ मालिकेत सर्जेराव विखेपाटलांची भूमिका त्यांनी घराघरात आपली आबासाहेब म्हणून ओळख मिळवली जी आजही तशीच आहे. पण तुम्हाला माहीत आहे का नागेश भोसले यांच्या मुलीने सिनेसृष्टीपासून दूर राहण्याचा निर्णय घेत एक वेगळं क्षेत्र निवडलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kuhu Bhosle (@kuhubhosle)

आपल्या सर्वांना माहीत आहे की, बॉडीबिल्डिंग क्षेत्रात महिलांचा सहभाग खूप कमी दिसतो. मात्र याच क्षेत्रात नागेश भोसले यांची मुलगी नावीन्यपूर्ण काम करत आहे. विशेष म्हणजे मुलीच्या या निर्णयाला या नागेशनेही पाठींबा दिला आहे.

नागेश यांची लेक कुहू भोसलेने बॉडी बिल्डर क्षेत्र निवडलं असून ती आज एक प्रसिद्ध बॉडी बिल्डर आहे.कुहू एक प्रसिद्ध अँथलेट आणि वुमन्स बॉडीबिल्डर आहे.कुहुने या क्षेत्रात वयाच्या १७ व्या वर्षी पाऊल ठेवले.कुहूने फिटनेसला जास्त महत्त्व देत बॉडी बिल्डिंगचं क्षेत्र निवडलं.कुहूने अनेक वुमन्स बॉडी बिल्डिंग स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे.

कुहू फिटनेस ट्रेनर असून ती खेळाडू देखील आहे ऐमचर ऑलंपियामध्ये तिनं कांस्य पदकाची कमाई केली आहे. हे करिअर निवडण्यासाठी तिला तिच्या घरच्यांचा नेहमीच पाठिंबा होता, असं ती सांगते.यासोबत कुहूने अॅमेच्युअर ऑलंपियामध्ये ब्राँझ मेडल पटकावलं आहे.कुहु बॉडी बिल्डिंगसोबत ट्रेनर म्हणूनही काम करते.कुहु सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असते. ती अनेक फोटो, फिटनेस फ्रिक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

ऐमचर ऑलंपियामध्ये कुहूने कांस्य पदक पटकावलं होतं. परदेशातील अनेक महिला या क्षेत्रात आहे. परंतु भारतात हे प्रमाण खूप कमी आहे. याबाबत बोलताना कुहू म्हणाली की, मला करिअर निवडण्याचं माझ्या आईवडिलांनी स्वातंत्र्य दिलं. त्यामुळे मीसुद्धा न घाबरता या क्षेत्रात उतरले.

प्रत्येक मुलाला त्याच्या आवडीनुसार करिअर करण्याचा अधिकार आहेय माझ्या मुलीनंही तिला आवडणाऱ्या क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतलाय, मला त्याबद्दल आनंदच आहे. निर्णय बदलण्यासाठी मी देखील कधी तिच्यावर दबाव टाकला नाहीए, असं नागेश भोसले म्हणतात.

 

Leave A Reply

Your email address will not be published.