अप्पी आणि अर्जुनची पहिली संक्रात होणार जोशात साजरी.. एक तासाच्या विशेष भागाची झाली तयारी..
झी मराठीवरील अप्पी आमची कलेक्टर ही मालिका सध्या प्रेक्षकांची जबरदस्त लोकप्रियता मिळवत आहे.. अतिशय खडतर अशा प्रवासातून कलेक्टर बनायचं स्वप्नं उराशी बाळगणारी अप्पी जोमाने अभ्यासाला लागलेली आहे. तिच्या या प्रवासात तिच्या वडिलांची तिला साथ मिळत आहे. मात्र दरम्यानच्या काळात आईच्या इच्छेखातर ती लग्नाला तयार झालेली पाहायला मिळाली. आणि मालिकेत आला मोठा ट्विस्ट. अप्पी आमची कलेक्टर या मालिकेत अर्जुन आणि अप्पीच्या प्रेमाचे सूर जुळले आणि त्यांचा सुखाचा संसार मालिकेत पहायला मिळत आहे.
सध्या ही मालिका आता अतिशय उत्कंठा वर्धक वळणावर येऊन ठेपली आहे. मालिकेत रोज काही ना काही छोटेमोठे ट्विस्ट पहायला मिळत आहेत. अशातच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. अप्पी अर्जुनचं लग्न झाल्यानंतर मालिकेत नवा वळणं आलं आहे. अर्जुन अप्पीला कलेक्टर बनवण्यासाठी तिच्या पाठीशी ठामपणे उभा राहून तिला प्रोत्साहन देताना दिसणार आहे, आणि अप्पी नक्की कलेक्टर बनणार हा त्याचा ठाम विश्वास आहे.
अप्पीचा कलेक्टर बनण्याचा प्रवास सुद्धा सुरु झाला असल्याचे मालिकेत पहायला मिळत आहे. आणि याचे महत्वाची बाब म्हणजे यात तिला अर्जुनची साथ मिळतेय, लवकरच मालिकेत अप्पी लग्नानंतरची पहिली संक्रांत साजरी करताना आपण पाहणार आहोत, हलव्याचे दागिने घालून दोघे सजलेले आपण पाहू शकणार आहोत, तसेच आपल्या आवडत्या राणादा आणि अंजलीबाईची सुद्धा लग्नानंतरची पहिली संक्रांत साजरी होणार ‘होम मिनिस्टर’ च्या १ तासाच्या विशेष भागाच्या निमित्ताने या दोन्ही जोडप्यांची संक्रात प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.
View this post on Instagram
दरम्यान, मालिकेत याआधी आपण पाहिले अर्जुन अप्पीला एका रोमँटिक सफरीवर घेऊन जातो. पॅराग्लायडिंग करत असताना अर्जुन अप्पीला प्रपोझ करतो, पण अप्पी अर्जुनशी लग्न करण्यास नकार देते. पण अर्जुन आपल्या म्हणण्यावर ठाम असतो, तो अप्पीला सांगतो माझ्याशिवाय तुझं लग्न होणार नाही. त्यानंतर मोठा ट्विस्ट येऊन या दोघांचे लग्न झालेले आपल्याला मालिकेत पहायला मिळाले.
या मालिकेचा नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भलताच पसंतीस उतरतोय. आगामी भागात अप्पीचा लग्नानंतरचा प्रवास कसा असेल हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अप्पी कलेक्टर झाल्यावर ‘घरात बायको, बाहेर बॉस’ कसा असेल हा नवा प्रवास? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. शिवाय याविषयी सोशल मीडियावर अनेक चर्चा रंगत आहेत.
दरम्यान, संक्रात विशेष हा भाग पाहण्यासाठी चाहते कमालीचे उत्सुक असल्याचे चित्र सोशल मीडियावर पहायला मिळत आहे.