अप्पी आमची कलेक्टर मालिकेत आला मोठा ट्विस्ट, अर्जुन येईल का शहनशाह म्हणून गावासमोर?
‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेनं अल्पावधीत लोकप्रियता मिळवली आहे. खेडेगावात राहणाऱ्या आणि आर्थिक परिस्थिती जेमतेम असलेल्या अप्पीला कलेक्टर व्हायचं आहे. त्यासाठी ती जीवतोडून मेहनत घेत आहे. अभ्यास करत आहे. तिच्या अभ्यासामध्ये अनेक अडथळे येतात परंतु त्यावर अप्पी जिद्दीनं मात करते. यामध्ये तिला अर्जुनची नकळत साथ मिळत असते.
अप्पी आमची कलेक्टर ही मालिका प्रेक्षकांना भावते आहे, अप्पी आमची कलेक्टर मालिकेबद्दल प्रेक्षकांच्या मनातही आता उत्सुकता निर्माण झाली आहे. मालिकेत आतापर्यंत अनेक ट्विस्ट आले आहेत. ही मालिका आता एका रंजक वळणावर आली आहे.कारण संपूर्ण गाव शेहेनशाहच्या शोधात आहे. दरम्यान, मालिकेत दाखवण्यात येत आहे की, पृथ्वी, सुजय आणि रॉकेट मिळून अप्पीला किराणा माल न मिळावा म्हणून खूप प्रयत्न करतायत आणि शेहेनशाह समोर आल्याशिवाय तुला किराणा मिळणार नाही अशी धमकी सुद्धा देतात.
आणि यावेळी दिप्या अर्जुन समोर जाऊन विनंती करतो तेव्हा अर्जुन शेहेनशाह म्हणून पूर्ण गावा समोर येण्याच ठरवतो. अर्जुनला आप्पी, छकुली लोकांसमोर येण्यास मनाई करतात. अर्जुनला अप्पी, छकुली लोकांसमोर येण्यास मनाई करताना दिसून येत आहेत. पण आता काही पर्याय नसल्याने अर्जुन लोकांसमोर येऊन उभा राहतो.
पण इतक्यात मागून शेहेनशाह सापडला असा आवाज येतो. तर दुसरीकडे यशा अप्पीच्या अभ्यासासाठी शहनशहा म्हणून सर्व गावासमोर आल्याचे समोर येते. त्याला पाहुन सर्वानाच धक्का बसतो. यशा शेहेनशाह आहे कळल्यावर प्रतापची माणसे यशाला पूर्ण गावासमोर मारायला पुढे येतात. पण त्यांच्यापासून अर्जुन त्याला वाचवून पोलीस स्टेशनला घेऊन जातो. तेव्हा अर्जुनने पुन्हा अप्पीची बाजू घेतल्याने प्रतापराव त्याला निलंबनाची धमकी देतात. आता अर्जुन संपूर्ण गावासमोर शहनशहा म्हणून समोर येईल का आणि अर्जुनच शेहेनशाह आहे हे सर्वांना कळल्यावर काय होईल? हा प्रश्न उभा राहिला आहे.
दरम्यान, अर्जुन अप्पीला नेहमी मदत करताना दिसून येतो. या मालिकेत अर्जुनचे पात्र हे बहुरंगी आहे. सोबतच अर्जुनच्या भूमिकेला अनेक पैलू आहेत. अर्जुन हा एक पोलीस ऑफिसर असून त्याचा चतुर स्वभाव ,काम करण्याचे कसब वेगळेच आहे.आपल्या अंगी असलेल्या अनेक गुणांचा तो पोलीस ऑफिसर म्हणून उपयोग करून घेताना दिसून येतो. यामुळेच त्याने सुरू केलेल्या या खेळात नक्की कोणाला यश येईल हे मालिकेच्या आगामी भागात पहायला मिळेल.