आई कुठे काय करते मालिकेवर संतापले प्रेक्षक म्हणाले,…”अत्यंत भंगार मालिका”

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ ही  मालिका सध्या टीआरपी चार्टवर टॉपला आहे. मालिका सुरू झाल्यापासून आजपर्यंत या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. या मालिकेचा प्रेक्षकवर्गही मोठा आहे. दरम्यान मालिकेत अरुंधतीचा मोठा मुलगा अभिषेकचेही दुसऱ्या स्त्रीबरोबर संबंध असल्याचं दाखवण्यात येत आहे. त्यानंतर मालिकेवर प्रेक्षक खूप संतापले होते. आता असाच काहीसा एक प्रकार घडला आहे.

दरम्यान, मालिकेत अभिषेकची पत्नी अनघाने गोंडस मुलीला जन्म दिला आहे. देशमुख कुटुंबात कन्येचे आगमन झाल्यामुळे सगळेच आनंदी आहेत. परंतु, अभिषेकने विश्वातघात केल्यामुळे अनघावर मोठा डोंगर कोसळला आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भागात अरुंधती अनघाचे सांत्वन करताना तिच्यासाठी अंगाई गाताना दिसून आली. एकदा काय झाले या चित्रपटातील “बाळाला झोप का गं येत नाही” ही अंगाई अरुंधतीने गायली. हा चित्रपट मराठीतील सुप्रसिद्ध गायक सलील कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केला आहे. ही अंगाईही त्यांनीच लिहिली आहे.

सलील कुलकर्णी यांनी मालिकेतील अरुंधतीचा अंगाई व्हिडीओ सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर करत मधुराणी गोखलेचं कौतुक केलं. दरम्यान त्यांच्या या पोस्टवर एका युजरने कमेंट केली की, “गाणं छान आहे पण मालिका अत्यंत भंगार.”

या युजरला सलील कुलकर्णी यांनी अगदी सडेतोड उत्तर दिलं आहे. ते या कमेंटला उत्तर देत म्हणाले, “ही कमेंट तुम्ही वाहिनीच्या किंवा मालिकेच्या अकाऊंटवर करायला हवी. बरोबर ना?” नेटकऱ्यांनी मात्र अरुंधती म्हणजेच मधुराणी गोखलेच्या या व्हिडीओचं कौतुक केलं आहे.

दरम्यान, अनघा आणि त्यांची लेक देशमुखांच्या घरी परतल्या आहेत. मात्र, या सगळ्यात अनघाने अभिषेकला सतत टाळण्याचा प्रयत्न केला. अभिषेकने केलेली चूक ही अतिशय अक्षम्य असून, अनघाने त्याला शिक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, अनघा आता घरी थांबणार की, अरुंधती प्रमाणे देशमुखांचं घर सोडून निघून जाणार? तिचा निर्णय काय असणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

यावेळी अरुंधती आणि अनघाची आई अनघाशी बोलण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. अनघा आता काय निर्णय घेणार हे त्यांना देखील जाणून घ्यायचं होतं. मात्र, आपण अजून काहीच निर्णय घेतला नाही, असे अनघा त्यांना सांगते. यानंतर अनघा म्हणते की, ‘मी कदाचित हे घर सोडून जाणार नाही, पण माझं आणि अभिचं नातं आता पुन्हा पूर्वी सारखं होण्याची शक्यता नाहीये.’ आता मालिकेत पुढे काय घडणार? अनघा घर सोडून जाणार का? याची उत्तरं येत्या भागांमध्ये मिळणार आहेत..

Leave a Comment

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप